महिलांचे राजकारण तील योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/zfayaa39Abstract
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर शिक्षणाचा प्रचार, प्रसार व जागृती झाली व यामुळे आज भारतीय खी सर्वच क्षेत्रामध्ये स्थान मिळविल्याचे दिसून येते. भारतातील स्त्रिया ज्याप्रमाणे सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे निदर्षनास येत आहेत. चूल आणि मूल ऐवढेच स्त्रियांचे क्षेत्र राहीलेले नसून त्या आज राजकारणात, समाजकारण तथा आर्थिक क्षेत्रात येवून आपली प्रगती तसेच देशाच्या प्रगतीला हातभार लावतांना दिसत आहेत. सध्या भारतीय विकासातील नेमकं स्थान काय असेल, याचा वेध घेतांना असे लक्षात आले की, मागील काही दशके स्त्रियांना कुटूंबात दर्जा व स्थान देण्यास खर्ची पडलेले दिसून येतो परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले, महर्षि कर्वे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी स्त्री सुधारणा व श्री उन्नतीसाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून स्त्रियांना आत्मबळ प्रकट करण्याची ईच्छाशक्ती प्राप्त होऊन कर्तुत्व सिध्द करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे आज भारतीय स्त्रीयांची विसाव्या शतकात कुटूंबातील आणि पर्याययाने समाजातील स्थान उंचावले. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कृषिवर आधारित असलेल्या ग्रामिण समाजाला सक्षम बनविण्याचे मोठे आव्हान होते. म. गांधी यांनी ग्रामविकासावर वियेश भर दिला होता. महिला, समाज आणि राष्ट्राच्या विकासातील एक महत्वपूर्ण अंग आहे. तरीसुध्दा आज महिला उपेक्षित जीवन जगत आहेत