उच्च शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीची शैक्षणिक अभिरुची आणि व्यावसायिक महत्वाकांक्षा यातील सहसंबंधाचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/m5dhtv58Abstract
प्रस्तुत संशोधनात उच्च शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक अभिरुची आणि व्यावसायिक महत्वाकांक्षेतील सहसंबंधाचा अभ्यास वर्णनात्मक संशोधन पद्धतीतील सर्वेक्षण संशोधन पद्धतीने करण्यात आले आहे. एकूण १७० विद्यार्थिनींचा सहेतुक नमुना निवडण्यात आला. शैक्षणिक अभिरुची आणि व्यावसायिक महत्वाकांक्षेचे मापन करण्यासाठी संशोधकाने स्वनिर्मित शोधिका वापरली आहे. संकलित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी मध्यमान, प्रमाण विचलन व टी मूल्य या संख्याशास्त्रीय परिमाणाचा अवलंब करण्यात आला आहे. निष्कर्ष व्यावसायिक महाविद्यालयातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शैक्षणिक अभिरुची व व्यावसायिक महत्वकांक्षा शैक्षणिक महाविद्यालयातील ग्रामीण विद्यार्थिनींपेक्षा अधिक दिसून येते. व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक अभिरुची आणि व्यावसायिक महत्वाकांक्षेमध्ये उच्च आणि सकारात्मक सहसंबंध दिसून येतो. शैक्षणिक महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक अभिरुची आणि व्यावसायिक महत्वाकांक्षेमध्ये देखील उच्च आणि सकारात्मक सहसंबंध दिसून येतो