स्त्रीत्वाचे भान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

Authors

  • प्रा. डॉ. सतीश जगन्नाथ निकम Author

DOI:

https://doi.org/10.7492/k630sg49

Abstract

आधुनिक कालात आज असे एकही क्षेत्र असे आढळून येणार नाही, कि ज्यात स्त्रियांनी आपल्या अस्तित्वाचा, प्रगतीचा झेंडा रोवला नाही. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कौशल्याच्या बळावर स्त्रियांनी आपल्या यशाची मोहोर ठळकपणे उमटविली आहे. आज जेव्हा स्त्रियांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते तेव्हा यामागे स्त्रीला तिचे आत्मभान जागृत झाल्याचा निष्कर्ष अनेक वि‌द्वान काढतात. "आपल्या स्त्रीत्वाचे जन्मदत्त आणि व्यक्तिगत पैलू कोणते आणि समाजदत्त पैलू कोणते याचे तिला आकलन होऊ लागले. हे आकलन तिला आतून उजळून टाकणारे होते, तसेच भोवतालच्या समाजाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणारे." परंतु ही कारणमीमांसा पुरुषसत्ताकतेच्या दमनकारी इतिहासाची दडपणूक आहे. जर त्या इतिहासाला दुर्लक्षून आजच्या स्त्रीला स्त्रीत्वाचे भान होत राहिले, तर त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांच्या वंचीततेचा मागोवा घेतल्यास ते पुरुषप्रधान व्यवस्थेने जाणीवपूर्वक रुजविलेल्या मिथमध्ये आढळते ते म्हणजे, लिंगभेदाधारीत दुय्यमत्व. डॉ. मिलिंद बोकील प्राणिजगतातील बोधप्रत उदाहरण देऊन तसेच आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि भारतासह काही आशियाई जमार्तीचे उदाहरण देऊन म्हणतात, "शारीरिक क्षमता म्हणजे केवळ दंडातील ताकद नव्हे. शारीरिक क्षमतेमध्ये स्नायूंची लवचिकता, सहनशक्ती, ताण सोसू शकणारी क्षमता, चिकाटी, जोम आणि कंटाळा येऊ न देता सातत्याने कष्ट करण्याची क्षमता अशा निरनिराळ्या गोष्टींचा समावेश होतो. डॉ. बोकिलांच्या विधानावरून आपणांस हे लक्षात येते की, स्त्रियांचे दुय्यमत्व हे नैसर्गिक असल्याचे केवळ एक मिथ उभे करण्यात आले आहे. स्त्रीचं स्त्री असणं किंवा पुरुषाचं पुरुष असणं ही बाब कोणत्याही रीतीने कोणावर दुय्यमत्व लाद शकत नाही.

Downloads

Published

2011-2025