महिला शेतमजुरांच्या समस्या व उपाययोजना
DOI:
https://doi.org/10.7492/knada121Abstract
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील 70 टक्के लोकसंख्या कृषीवर आधारित व्यवसाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या असलेले आढळतात. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर केंद्रित आहे. ही अर्थव्यवस्था चालवण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक घटक राबत असतात त्यात मोठे शेतकरी, लहान घेतकरी, भूमीहीन शेतमजूर स्त्री पुरुष, पांरपरिक कामगार इत्यादी. भारतात शहरीकरणाचा वेग वाढत असताना देखील भारतातील खेडी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. 2011 नुसार भारतात 5.6 लाख खेडी असुन 72. 22 टक्के लोकसंख्या ग्रामिण भागात राहते. कृषी क्षेत्रामध्ये 64 टक्के लोकसंख्या गुंतली असून 58 टक्के व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो अशा भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचा आणि ग्रामिण विभागांमधील आर्थिक व सामाजिक जीवनाचा शेतमजुर हा महत्वाचा घटक आहे. भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्था असणा-या देशात शेतमजुर वर्ग बराच मोठा आहे भारतात अनेक शेतक-यांकडे महिला शेतमजुर काम करताना दिसून येतात. महिला शेतमजुरांमध्ये अज्ञान, निरक्षरता, दारिदय व त्यांचा कर्जबाजारीपणा, ग्रामीण समाजात त्यांना प्राप्त झालेले अत्यंत खालचे स्थान, ताठर समाज व्यवस्था अशा अनेक कारणांमुळे महिला शेतमजुरांना आपली पिळवणुक होत असल्याचे दिसुन येते