‘आमची श्रीवाणी’ विशेषांकातील मिथक आणि मराठी साहित्य
DOI:
https://doi.org/10.7492/5nmxgw41Abstract
. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेचे मुखपत्र 'आमची श्रीवाणी' या विशेषांकातील जून 2001 वर्ष 8 अंक 3 यात मिथक आणि मराठी साहित्य या संदर्भात अनेक संपादकांनी आपले लेख प्रकाशित केलेले आहे. मराठी अभ्यास परिषदे मार्फत औरंगाबाद येथे मिथक आणि मराठी साहित्य या विषयावर दोन दिवसाचे चर्चासत्र घेण्यात आले कारण मिथक संबंधीची संकल्पना मुळात अनेकांच्या मनात स्पष्ट नाही. आणि इतर भाषेच्या तुलनेने मराठी या विषयावर तेवढे लिखाण दिसून येत नाही त्यासाठी या विशेषांकात विशेष म्हणजे डॉ.विश्वनाथ खैरे यांनी मिथ्य आणि मराठी साहित्य याविषयी बीजभाषण दिले. व इतर संपादकांनी आपले लेख प्रस्थापित केले डॉ. मु. ब. शहा यांनी मिथक: समीक्षेच्या मानदंड, डॉ. रवींद्र किंबहुने यांनी मिथक: समीक्षेच्या संदर्भात, डॉ. भास्कर गिरधारी यांनी मिथ आणि कर्ण, डॉ. सुधीर कोठावडे यांनी मराठी आणि हिंदी कवितेतील शंबूक-एकलव्य, प्रा. प्रभाकर बागले यांनी मिथक आणि मराठी साहित्य: द्रौपदी तर प्रा. सुषमा दाते यांनी मिथक व साहित्य परस्पर संबंध याविषयी अभ्यासपूर्ण लेख या विशेषांकात आपल्याला मिथक आणि मराठी साहित्य संदर्भात दिसून येतात.