समाजसेवा आणि महाराष्ट्रीयन महिला
DOI:
https://doi.org/10.7492/63829876Abstract
आपण एकविसाव्या शतकात वावरत असतांना मनुष्याने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात गरूडझेप घेतली आहे.त्यात स्त्रीयांचे खूप मोठे योगदान आहे. जीवनाची अशी कोणतीच क्षेत्र उरले नाही जिथे भारतीय स्त्रीने पुरूषाच्या बरोबरीने प्रगतीत केली. मनुष्य आज चंदावर गेला. उच्च तंत्रज्ञान, स्पेससेक्टरमध्ये भारतीय स्त्री उंच शिखर गाठत असतांना समाजसेवा क्षेत्रात तर भारतीय स्त्री चा इतिहास साक्ष आहे. जसे, 18 व 19 व्या शतकामध्ये अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, रोग्यांची सेविका मंदाताई, साधनाताई आमटे, मेघा पाटकर पर्यंत अशा अनेक समाजसेवी महिलांची महाराष्ट्राला जणू परंपराच लाभलेली आहे.
प्राचिन काळातील स्त्रीयांच स्थान, तीचे चुल आणि मुल असे कार्यक्षेत्र दिल्ली पासून तर तीच्या स्वःच्या घरात होणाऱ्या अन्याय अत्याचाराला फाटा देत प्रगतीची सर्वच क्षेत्र आज स्त्री यांच्या कामगीरीने व्यापुन गेलेली आहेत. स्वातंत्रकाळा नंतरचे तिच्या बद्दलचा समाजाचा बदलता दृष्टिकोन किंबहूना आजची घरातील तीची जबाबदारी, बदलती भूमिका याबाबत पुर्वीच्या तुलनेत कमालचा उच्चांक गाठलेला आहे. परिणाम स्वरूप हा विषय संशोधनासाठी महत्तम आहेत.