भारतीय स्वातंत्र्यलढयातील कर्तृत्ववान महिला - एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/wtfz2923Keywords:
योगदान, स्वातंत्र्य लढा, शौर्य, साहस, संघटन कौशल्य, निस्सिम देशप्रेम, देशप्रेम, राष्ट्रविकास, नियोजनबद्ध आराखडा, स्वाभिमान, बलिदान, सत्याग्रह, असहकार, बहिष्कार, अभिमानAbstract
भारतीय स्वातंत्र्यलढयामध्ये अनेकांनी आपले योगदान तर काहींनी बलिदान दिले आहे हे आपण ऐकतो आणि वाचतोही यामधुन आपल्याला प्रेरणाही मिळते. पंरतु तत्कालिन परिस्थितीमध्ये काही महिला अशाही होत्या की, ज्यांनी स्वातंत्र्यलढयात स्वतःला झोकुन दिले. शौर्य, साहस, संघटन कौशल्य आणि निस्सिम देशप्रेमापोटी स्वातंत्र्यलढ्यात कार्य केले यामध्ये पुरुषापेक्षा तसुभरही महिलांचे कार्य कमी नाही. अगदी आम्ही पुरुषापेक्षा कुठेच कमी नाहीत हे महिलांनी स्वतःच्या कार्यातुन सिध्द केले. दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्यानंतर भारतीय नागरीक मुक्त श्वास घेऊ लागला. प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेम, राष्ट्रविकास, समाजविकासाची स्वप्न रंगू लागली. काहीजन ती प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी नियोजनबद्ध आराखडाही करु लागली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण स्वाभिमानाने आणि ताठमानेने म्हणतो, आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत परंतु या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपले योगदान आणि काहीनी बलिदान दिले आहे. त्यांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. याबरोबरच सत्याग्रह, असहकार, इंग्रजांना विरोध, विदेशी मालावर बहिष्कार असे अनेक विविध उपाय त्यावेळेस सामान्य जनतेनेही केले आहेत. सामान्य जनताही यामध्ये मागे नव्हती असेच म्हणावे लागते. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तळमळत होता. भारतीय स्वातंत्र्य लढयात महिला मागे नव्हत्या. त्यांनी देखील स्वतःला स्वातंत्र्यलढयात झोकून दिले होते. स्वातंत्र्यलढयातील या महिलांचे योगदान कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि वाखणण्याजोगे आहे. या महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. अशा महिला स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याला उजाळा मिळणे आवश्यक आहे.