आदिवासी भागातील माध्यमिक स्तरावरील मुला मुलींमध्ये लैंगिक असमानता दूर करण्यासाठी राबवलेल्या कृती उपक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/zvg24h97Abstract
प्रस्तुत संशोधनात माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी प्रसार माध्यमांची माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील लैंगिक असमानता दूर करण्यासाठी राबवलेल्या विविध कृती उपक्रमांची परिणामकारकता अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी प्रायोगिक संशोधन पद्धतीची निवड करण्यात आली होती. यासाठी सहेतुक नमुना निवड पद्धतीच्या आधारे माध्यमिक स्तरावरील 60 विद्यार्थ्यांना पूर्वचाचणी व उत्तर चाचणी देण्यात आली. पूर्वचाचणी देत असताना त्याचे मध्यमान प्रमाण विचलन या सांख्यिकीय तंत्राचा वापर केला. त्यानंतर संशोधकांनी प्रसार माध्यमांच्या आधारे विविध कृती उपक्रमांचा आधारित घेऊन लैंगिक असमानता दूर केली त्यानंतर विद्यार्थ्यांना लैंगिक असमानतेची उत्तर चाचणी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून असे दिसून येते की पूर्व आणि उत्तर चाचणी मध्ये विद्यार्थ्यांमधील खेळामधील व सहशालेय उपक्रम आतील लैंगिक असमानता प्रसारमाध्यमांचा आधारावर जे कृती उपक्रम राबवले त्यातून ती असमानता दूर होण्यास मदत झाली.