भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल
DOI:
https://doi.org/10.7492/t0fn1864Abstract
भारतीय संस्कृतीत नेहमी स्त्रियांचा सन्मान केला गेला आहे. स्री व पुरुष समाजाची अविभाज्य घटक आहेत. ज्यांच्यावर समाजाची सर्वांगीण प्रगती अवलंबून असते.प्राचीन काळात स्त्रियांना विवाह, शिक्षण यांचे स्वातंत्र होते.परंतु मध्ययुगामध्ये स्त्रियां वर अनेक बंधने लादली गेली. १९ व्या शतकात भारतात पाश्चात्य विद्येचा प्रसार होऊ लागला आणि एका मोठ्या युगपरिवर्तनाला सुरुवात झाली. आधुनिक काळात पुन्हा स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज शिक्षणाने स्त्रियांना केवळ साक्षर केले नाही तर स्वतःकडे, जीवनाकडे, जगाकडे आणि सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची नवीन दृष्टी दिली. तीस्वतंत्रपणे विचार करू लागली. स्वतःला पारंपारिक कल्पनांतून मुक्त करून ज्ञान संपादन केले. स्वतःच्या जीवनाकडे डोळसपणे बघू लागल्या. काळाबरोबर पुढे येणाऱ्या नवीन विषयांकडेही स्री वळलेली दिसते. आज स्रिया अनेक क्षेत्रात आघाडीवर कार्य करताना दिसतात. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबरीने काम करीत आहेत. प्राचीन काळापासूनच भारतीय स्त्रियानी अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. स्री अशिक्षित असो व शिक्षित परंतु ती तिच्या आत्मविश्वासाच्या जोरावर नेहमीच समाजाच्या प्रगतीच्या वाटा निर्माण करते. स्त्रियांच्या योगदानाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे. अशाच कर्तबगार महिलांच्या कार्याचे संशोधन करून शोधप्रबंधातून त्यांच्या कार्याची ओळख करण्यात आली आहे.