गंगाधर शास्त्रीचा खून आणि पेशवे, गायकवाड यांच्यावर झालेल्या आरोपांचा चिकित्सक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/qe3hk612Keywords:
ब्रिटीश, सुभा, खून, इतिहासकार, आरोपAbstract
पेशवे आणि गायकवाड यांच्यात मतभेद होते. इ. स. १८५३ पासून पेशवे गायकवाड देवाण - घेवाणीचा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात देवाण - घेवाणीचा प्रश्न मिटविण्यासाठी इंग्रजांनी मध्यस्थी केली. इंग्रजांच्या संरक्षणात गायकवाड यांचा मुतालिक गंगाधरशास्त्री पटवर्धन इ. स. १८१४ मध्ये पुण्यात आला. परंतु इ. स. १८१५ मध्ये पंढरपूर येथे गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून झाला. या खुनामुळे मराठा राज्यसंघात एकच खळबळ माजली. गंगाधरशास्त्री पटवर्धनच्या खुनाचा आरोप पेशवे व गायकवाड या दोन्ही सत्ताधीशांवर केला गेला. इंग्रजांनी शास्त्रीच्या खुनाचा त्र्यंबकजी डेंगळेवर आरोप केला. परंतु गंगाधरशास्त्री पटवर्धनाच्या खुनाचा फायदा पेशवे किंवा गायकवाड यांना झाला नाही. या खुनाचा चिकित्सक तपास केल्यास गंगाधरशास्त्री पटवर्धनाच्या खुनाचा सर्वात जास्त फायदा इंग्रज शासनास झालेला दिसतो. त्यामुळेच पंढरपुरात इंग्रजांनीच मारेकऱ्यांकरवी गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून करविला असे म्हणता येईल.