चाळीसगाव तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील समायोजन व्यवस्थापन प्रशिक्षणाचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/ykagt917Abstract
देशाचा विकास हा त्या देशातील लोकसंख्येच्या विधायक कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. लोकसंख्येची कार्यक्षमता ही वाढविण्यासाठी समायोजन व मानसिक आयोग्य याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते. देशाच्याच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व करिअर विकासासाठी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना समायोजन व मानसिक आरोग्य याविषयी सतर्क असणे आवश्यक आहे.
समायोजन म्हणजे व्यक्तीने समस्या व कठीण प्रसंगांना सहजतेने हाताळ्ण्याची क्षमता होय. सामाजिक वर्तन, आनंदी स्वभाव, सतर्ककता हे उत्तम मानसिक आरोग्याचे महत्त्वाचे घटक आहेत.
प्रस्तूत संशोधन पेपरमध्ये चाळीसगाव तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांमधील समायोजन व्यवस्थापन प्रशिक्षणाचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या यांचा अभ्यास करण्यात आला आहे.