महिला कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/t50n8x78Keywords:
महिला कामगार, घरगुती महिला कामगार, आणि ग्रामीण महिला कामगारांची सामाजिक व आर्थिक स्थिती, महिला सक्षमीकरणAbstract
महिला कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीची दखल घेऊन त्याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामागे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका ही पार पाडणे तेवढेच गरजेचे आहे. महिला कामगारांची सामाजिक स्थिती ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते तसेच आर्थिक स्थिती देखील लक्षात घेऊन त्यातील ताळमेळ लक्षात घेऊन त्यांच्या समस्यांची चाचपणी करण्यासाठी दोन्ही घटकांमधील फरक व ताळमेळ लावणे हे या अभ्यासाचे प्रमुख उद्देश आहे. औद्योगिक क्रांतीनंतर, 20 व्या शतकात औद्योगिक राष्ट्रांमध्ये घराबाहेरील कामगारांमध्ये महिलांचा समावेश वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिक समाजासाठी वरदान म्हणून पाहिले जाते, कामगार वर्गातील स्त्रिया राष्ट्रीय आर्थिक उत्पादनात योगदान देत आहेत तसेच समाजात श्रम पुरवठा वाढवून कामगार आर्थिक खर्च कमी करतात. त्यात त्यांची स्व:इच्छा, जबाबदारी, तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्य तेवढच महत्त्वाचे आहे.
महिलांना पुरूषांप्रमाणे उच्च दर्जा प्राप्त व्हावा आणि त्यांनाही आपापल्या कौशल्यामध्ये आपली जबाबदारी पाडण्यासाठी अधिकार मिळावेत यासाठी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम संशोधन झालेले आहेत त्याचबरोबर पुस्तकाद्वारे देखील अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत त्यामधीलच एक म्हणजे 'मिळून साऱ्याजणी' हे पुस्तक आहे. यात वेगवेगळ्या महिला लेखकांची लेख छापून आली आहेत. महिलांच्या समस्या , त्यांचा अनुभव व प्रवास व त्यांचासमोरील आव्हाने, त्यांनी त्याच्या आयुष्याशी झुंज देऊन त्यावर मात केलेले लेख छापून आले आहेत. जे वाचून महिलांना नवी दिशा आणि गती नवी ऊर्जा मिळू शकते.