वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीमधील महिला सुरक्षाविषयक कायद्याविषयी असलेल्या साक्षरतेचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/1eysv165Abstract
प्रस्तुत संशोधनात, वरिष्ठ महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनीचा महिला सुरक्षा विषयक कायद्याविषयी असलेल्या साक्षरतेचा अभ्यास सर्वेक्षण संशोधन पद्धतीने केला आहे. सहेतुक नमुना निवड पद्धतीने शिरपूर तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील ९० (कला शाखा ३०, विज्ञान शाखा ३० व वाणिज्य शाखा ३०) विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. वरिष्ठ महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनीचा महिला सुरक्षा विषयक कायद्याविषयी असलेल्या साक्षरतेचे मापन करण्यासाठी संशोधकाची स्वनिर्मित मापिका तयार केली आहे. त्यात एकूण २० विधाने होती. प्रतिसाद नोंदविण्यासाठी सहमत, असहमत व सांगता येत नाही असे पर्याय देण्यात आले आहेत. संकलित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी मध्यमान, प्रमाणविचलन व टी मूल्य या संख्याशास्त्रीय परिमाणाचा अवलंब करण्यात आला आहे. प्रस्तुत संशोधनाच्या निष्कर्षावरून असे दिसून येते की, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींमध्ये महिला सुरक्षा कायद्याबद्दल कला शाखेतील विद्यार्थिनींपेक्षा अधिक साक्षरता दिसून येते. तर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींच्या महिला सुरक्षा कायद्यातील साक्षरतेत काही फरक दिसून येत नाही.