भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगती ची वाटचाल
DOI:
https://doi.org/10.7492/s3m19636Abstract
भारत हा विकसनशील देश आहे. भारतात 80 टक्के लोक खेड्यात राहतात. त्यामध्ये महिलां च्या विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते कुटुंब व्यवस्था ही भारताचे बलस्थान आहे. विकासाच्या प्रक्रियेमधून जात असताना देशातील विविध क्षेत्रातील विकासामध्ये पुरुषाप्रमाणे स्त्रिया सुद्धा हातभार लावत असतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले.भारतीय राज्यघटने देण्यात आलेले मूलभूत अधिकार हे महिलांच्या विकासाचा पाया आहेत. पुरुषान इतकी महिलांची क्षमता महत्त्वाचे हे ओळखून त्याला चालना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरी १९९० साली राष्ट्रीय महिला आयोग, राज्यस्तरावर १९९३ रोजी राज्य महिला आयोग, आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने भारतीय महिलांचे उद्योग क्षेत्रात आपली कार्य कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली. आज पाहिले तर महिलांनी कृषी,औद्योगिक, उद्योग,व्यापार,सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य ,सांस्कृतिक क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करून भरभराटीस आल्याचे दिसते .भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचिता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री पोलिस सेवेत दाखल झालेल्या पहिल्या महिला मदर तेरेसा याना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती त्या म्हणजे प्रतिभाताई पाटील तसेच भारतीय पहिली महिला गव्हर्नर श्रीमती अरुंधती भट्टाचार्य होय. गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब दिला गेला. स्त्री हीच त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजानपणा यांची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरुषाची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करीत आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई,ताराबाई शिंदे ,सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर,सुनीता विल्यम्स, अंजू जॉर्ज कल्पना चावला, सनिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच पोलीस सहकारी दल याबरोबर रिक्षा, ट्रक चालवणे, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम महिला यशस्वीपणे पार पाडत आहेत.बस कंडक्टर, पत्रकारिता,फायर ब्रिगेड ही क्षेत्र सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत. सध्या भारतात स्त्रिया उद्योगिक क्षेत्रात तसेच व्यापार, कृषी क्षेत्रात, राजकीय,सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे ठसा उमटवीत आहेत. तो खालील प्रमाणे