नागपूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी (प्रारंभापासून ते 1730 पर्यंत)
DOI:
https://doi.org/10.7492/1sn9je82Abstract
नागपूरच्या इतिहासाला प्राचीन असे वैभव आहे. प्रागैतिहासिक काळापासून नागपूर तथा परिसरामध्ये मानवाने वस्ती केलेली दिसून येते. पुरापासून काळापासून ते बृहदास्म ताम्र पाषाण कलापर्यंतची अवशेष नागपुर तथा परिसरामध्ये संशोधनातून आढळली आहेत. ऐतिहासिक काळामध्ये मौर्य यांच्या राजवटीच्या खानाखुणा या भागात दिसून येतात. त्यानंतरच्या राजवटीमध्ये सातवाहन, वाकाटक, कलचूरी, बादामीचे चालूक्य, राष्ट्रकूट कल्यानिंचे चालुक्य, देवगिरीचे यादव इत्यादींनी या प्रदेशात राज्य करीत या क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक जीवन प्रभावित केलेले आहे. देवगडच्या गोंडानी आणि नागपूरच्या भोसल्यांनी अनेक वर्ष नागपूर आणि राज्य केले. नागपूरची ऐतिहासिक पायाभरणी करण्याचे श्रेय नागपूरवर राज्य करणाऱ्या गोंड आणि भोसले राजवटीला जाते.या सर्वांची केली या सर्व राजवटीची माहिती घेत नागपूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रस्तुत शोध पत्रातून विषद करीत आहे.