भारतीय महिलांची मराठी साहित्य क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल

Authors

  • डॉ. कल्याणी नाना शेजवळ Author

DOI:

https://doi.org/10.7492/605c9t40

Abstract

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशामध्ये अनेक जात, धर्म,  पंथ आणि वर्णाचे लोक अनेक वर्षांपासून पिढ्यानेपिढ्या एकत्र राहत आहे. परंतु या देशातील समाज हा जात, रुढी, परंपरा, धर्मशास्त्र,  नीती या तत्त्वावर करकचून बांधलेला आहे.  या देशाची व्यवस्था ही जात, धर्म, वर्ण, स्त्री आणि पुरुष भेद याच्या भक्कम पायावरती ही उभी आहे. धर्म, संस्कृती, समाजव्यवस्था, जात, धर्म, वर्ग, स्तर भेद, क्षेत्र, वर्ण, देश, प्रदेश पातळीवर देखील हा भेद लक्षात येतो, हे भेद कळत नकळत जन्मापासून ते मरेपर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपात दृश्य अदृश्य स्वरूपात एकमेकांमध्ये गुंफत, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत अविरतपणे कमी-अधिक स्वरूपात पुढे सरकत जाताना दिसतात. मातृत्व कर्तुत्व आणि नेतृत्व या तीनही पातळ्यांवरती स्त्रीचा असणारा लढा हा आजच्या स्त्रीच्या साहित्यतून कालभान आणि विश्वभान निर्माण करणारा आहे.

            साहित्य आणि समाज हे परस्पर पूरक आहे. समाजाशिवाय साहित्य आणि साहित्याशिवाय समाज जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळे समाज आणि साहित्य या दोघांचाही साहित्याच्या पटलावरती विचार करत असताना स्त्री आणि पुरुष महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरत आहे. समाजामध्ये घडणाऱ्या घटकांचा या दोन्ही केंद्रांवर त्याचा परिणाम होत असतो. पिढ्यानपिढ्या पुरुष केंद्रा भवती फिरणारी स्त्री कशी बदलत गेले आहे? हे बदल होण्यासाठी समाजामध्ये घडणाऱ्या घटना, प्रसंग,  चळवळी,  नियतकालिके,  शिक्षण, समाजसुधारकांनी केलेले प्रयत्न. राजाराम मोहन राँय,   गोपाळ आगरकर,  हिंदू कोडबिल,  महात्मा फुले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटना, महर्षी कर्वे स्त्रियांना मिळालेला शिक्षणाचा अधिकार, पाश्चात्य स्त्रीवादाचा परिणाम, भारतात स्त्रीवादाचे झालेले आगमन, त्या निमित्ताने छोट्या- मोठ्या रूपात स्त्रियांच्या होणाऱ्या सभा,  परिषदा,  चर्चासत्र,  लेखन हे देखील स्त्री साहित्याच्या लेखनाला प्रेरक ठरते.

Downloads

Published

2011-2025