भारतीय महिलांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल
DOI:
https://doi.org/10.7492/sbb8ab04Keywords:
स्त्रीया, समाज, शिक्षण, क्रांती, स्त्रीवाद, स्वातंत्र्य, विचारसरणी, नवी दृष्टीAbstract
19 व्या शतकात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यासारख्या समाजसुधारकांनी स्त्री उन्नतीसाठी अथक प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर महिलांमध्ये जागृती घडून आली. शिक्षणाचा प्रसार आणि तिला झालेल्या ‘स्व’ अस्तित्वाची जाणीव यामुळे महिलांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भारतात खऱ्या अर्थाने 1971 मध्ये स्त्री मुक्ती चळवळीला सुरुवात झाली. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये तिला समान दर्जा देण्यात आला. समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे महिलांची पुरुष दास्यत्वातून मुक्तता झाली. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने 1995 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने भारतीय महिलांना विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली. विसाव्या शतकात स्त्रीचं कुटुंबातील आणि पर्यायाने समाजातील स्थान उंचावले. आज महिलांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केल्याचे दिसत आहे. साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मराठीत स्त्रियांच्या लेखनाची परंपरा फार जुनी व संपन्न आहे. विविध कालखंडात स्त्रियांनी लेखन केलेले आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्त्रिया आपल्या समग्र अनुभवांना शब्दरूप देऊ लागल्या. स्त्रियांच्या पारंपारिक मानसिकतेत बदल होऊ लागला आणि त्याचे पडसाद स्त्रियांच्या लेखनात उमटू लागले. स्त्रीने तिच्या स्वतःच्या अनुभव विश्वातून निर्माण केलेले साहित्य खास तिचे आहे.