मुस्लिम मराठी स्त्री आत्मकथनकार : एक दृष्टिक्षेप

Authors

  • प्रा. डॉ. नामदेव भिला माळी Author

DOI:

https://doi.org/10.7492/ksjkme59

Abstract

मराठी साहित्यामध्ये विविध साहित्य प्रकार आहेत. प्रत्येक साहित्य प्रकाराची काही खास वैशिष्ट्ये आहेत. कथा, कादंबरी, काव्य, निबंध, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराबरोबर 'आत्मकथन' हा वाङ्मय प्रकार मराठी वाङ्मयामध्ये आपले मूळ रोवताना दिसतो. मराठी साहित्यात हा साहित्य प्रकार  उशिराने उदयास आला. दलित साहित्याच्या उदयामुळे या साहित्य प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आले. दलित साहित्यात आत्मचरित्राच्या लेखन ऊर्मीतून 'आत्मकथन' उदयास आले. मराठी साहित्यामध्ये वाङ्मय प्रकारांनी आपले अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मराठी साहित्यात आत्मकथन हा लेखन प्रकार आहे. यात मुस्लिम स्त्री लेखिका देखील आपल्या जीवन प्रवासावर त्यांनी आत्मलेखन केलेले आहे. यामध्ये मेहरुनिस्सा दलवाई यांनी 'मी भरून पावले आहे'  हे आत्मकथन लिहून आपल्या आयुष्यातील पतीच्या कार्यावर महती सांगितलेली आहे. श्रीमती खातुन बशीरद्धीन मत्तिकोप यांनी 'खातून' हे आत्मकथन लिहून भारतीय मुस्लिम स्त्रीच्या प्रपंचातील कर्तृत्वाची शक्ती किती अफाट असते हे या आत्मकथनातून दाखवून दिलेले आहे. 'मला उद्ध्वस्त व्हायचंय' हे आत्मकथन मल्लिका अमीर शेख यांनी लिहून आपल्या स्पष्ट व बेधडक निवेदन शैलीमुळे मराठी साहित्यात प्रकाश झोतात आहे.आपल्या जीवनामध्ये कोणाचेही, कसलीही भीती न बाळगता आपल्या जीवनातील प्रसंगांचे वास्तववादी चित्रण या आत्मकथनात केलेले आहे. जातीबाहेर विवाह करून एक वेगळाच पांडा निर्माण केला असला तरी त्यांनी आपले स्थान मराठी साहित्यात एक वेगळ्या उंचीवर निर्माण केलेले आहे. आशा अपराध यांचे भोगले जे दुःख त्याला हे आत्मकथन लिहून परिस्थितीशी काळाशी घडणाऱ्या लेखिकेने जीवनात  सोसलं, भोगलं ते त्यांनी आत्मकथनात वास्तववादीपणे  मांडलेली आहे. नसीमा हुरजूक यांचे देखील 'चाकाची खुर्ची' हे आत्मकथन आपलं वेगळं स्थान निर्माण करते.

Downloads

Published

2011-2025