सावित्रीबाई फुले यांचे कार्य
DOI:
https://doi.org/10.7492/qxfxwh71Abstract
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य श्रेष्ठ आहे. भारतात यांचे स्थान अद्वितीय आहे. म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी कष्ट घेतले प्रतिकूल परिस्थितीतही कार्य केले. यांच्या कार्यातून आदर्श व प्रेरणा खूप मिळते.
म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना जुनी बंधने, जुन्या प्रथा-परंपरा, समजुती तोडण्यासाठी मारेठा लढा द्यावा लागला आहे. म. फुले व सावित्रीबाई यांचे कार्य समाजाला चालना देणारे होते. सामाजिक कार्य करत असताना त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. म. फुले व सावित्रीबाई यांचे जीवन म्हणजे क्रांतीची धगधगती मशाल होय.
सावित्रीबाई फुले यांनी अपार कष्ट सहन करुन समाजाला सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक गुलामगिरीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. समाजात समाजवादी, मानवतावादी दृष्टीकोन रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शुद्र जाती, स्त्रीया ज्या अज्ञानी आहेत ते गुलामगिरीत जगणारे आहे. यांचे दु:ख नाहिसे करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला.