बहिणाबाई चौधरी : खानदेशाच्या मातीतील अस्सल सोनं

Authors

  • प्रा. डॉ. सौ. उज्वला पंकज नन्नवरे Author

DOI:

https://doi.org/10.7492/08z85919

Abstract

‘अरे संसार संसार

जसा तावा चुल्यावर

आधी हाताला चटके

तव्हा  मियते भाकर’

            आजही स्वयंपाक करताना संसाराचा गाडा ओढतांना प्रत्येक स्त्रीच्या ओठांवर ही कविता सहज येते. सर्वांना आपल्या वाटणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता जीवनाचे सार सांगून जातात. जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जातात. इतिहासाच्या पानावर कर्तृत्व गाजवणाऱ्या कितीतरी वीरांगणांची नावे कोरली गेली आहेत. त्याचप्रमाणे बहिणाबाईंचे नाव देखील प्रत्येक माणसांच्या मनात कोरल गेल आहे. बहिणाबाई हे एक नाव नसून एक विद्यापीठ आहे त्यांना निसर्गकन्या, भूमि कन्या, कृषी कन्या, खानदेश कन्या, अशा विविध नावांनी संबोधले गेले. जीवनाकडे पाहण्याची त्यांची सकारात्मक दृष्टी व त्यातून सहज काव्य निर्मिती, उपजत प्रतिभा शक्ती, हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.

            निसर्गात त्यांना जे गवसले ते त्यांनी कवितेतून मांडले. स्वानुभावातून शब्दांचे सौंदर्य फुलविले. सृष्टी निरीक्षणाची एक अजबदृष्टी त्यांच्याकडे होती. त्या निरक्षर होत्या पण अशिक्षित नव्हत्या त्यांच्या कवितेतून प्रकट होणारे तत्त्वज्ञान भल्या भल्यांना आश्चर्यचकित करणारे होते. नित्य नियमाच्या कामातून त्यांनी ज्या कविता मांडल्या त्या जीवनाचे सार सांगून जातात.

Downloads

Published

2011-2025