पश्चिम खानदेशातील आदिवासी भिल्ल समाजातील स्रियांचे स्थान एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/8vv9nh18Abstract
आदिवासी समाजाचा इतिहास हा खूप प्राचीन आहे रामायण महाभारतात सुद्धा त्यांचा उल्लेख पहावयास मिळतो. त्यांच्या रूढीपरंपरा, जीवनपद्धती, त्यांची संस्कृती ही इतर समाजाच्या तुलनेने वेगळी आहे. आदिवासी समाजात स्रियांना महत्वाचे स्थान आहे स्री ही निर्मिती म्हणून सर्वश्रेष्ठ मानून तिला कुटुंबमाता, जन्ममाता, जलमाता, जगोमाता, राजमाता अशा अनेक नावांची उपमा दिली आहे. आदिवासी समाजात स्री पुरुष दोघांना सारखेच महत्व असून ती दोघी संसाराची दोन चाके आहेत. स्री ही मातृत्वाची भूमिका पार पाडते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांचा पहिला गुरु म्हणजे त्यांची ‘आई’ असते. आईने दिलेल्या संस्कारामुळे ते परिपक्वता झालेले दिसून येतात. त्यामुळे स्री ही सुशिक्षित व सूसंस्कृत असणे आवश्यक आहे.
भारतामध्ये शेकडो आदिवासी जमाती आहेत त्यांच्या वेगवेगळ्या उपजाती ,शाखा, पोटशाखा यामध्ये विभागले गेले आहे. पश्चिम खानदेशात आदिवासी भिल्ल स्रीयांची प्रगल्भता, जानकारी, साक्षरता ही इतर स्रीयांपेक्षा कमी आहे. स्रीच्या सहभागाशिवाय कुटुंबाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शिरपूर, साक्री, नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नवापूर या भागात आदिवासी भिल्लांची वस्ती ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भिल्ल जमातीच्या दैनंदिन जीवनात स्रीयांची परिस्थिती ही अतिशय हलाकीची आहे कारण या समाजामध्ये आरोग्यविषयक समस्या, शैक्षणिकविषयक समस्या, आर्थिक समस्या वगैरे अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येतात.