शिक्षण, साहित्य आणि सामाजिक परिवर्तन यांचा त्रिवेणी संगम : सावित्रीबाई फुले
DOI:
https://doi.org/10.7492/nv33ad64Abstract
19 व्या शतकात भारतीय समाजातील स्त्रियांविषयी असलेली अमानुष रूढी व परंपरा या विरुद्ध लढण्यासाठी स्त्री शिक्षण या मूलमंत्राचा सर्वप्रथम उपयोग करणारी स्त्री म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. समाजातील कठोर विरोधाला न जुमानता फुले दांपत्यांनी मुलींसाठी सर्वप्रथम शाळा सुरू केली. दलित व अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. सार्वजनिक विहिरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. विधवा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी तसेच बाल विधवांना आश्रय देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह प्रतिबंध गृहाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबरच समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी साहित्यातून देखील आपले परखड विचार समाजासमोर मांडले. समाजात अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता व अन्यायाविरुद्ध त्यांनी आपले विचार कविता व भाषणे यामधून मांडले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, समाजसुधारणेसाठी दिशादर्शक ठरतात. त्यांच्या कार्यामुळे आज भारतीय महिलांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे.