महात्मा जोतीराव फुले यांचे स्त्री विकासात योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/762drr23Keywords:
स्त्री स्वातंत्र्य, स्त्री–पुरुष समानतेचा विचार, स्त्री शिक्षणाचा विचार, स्त्रीविषयक प्रश्न, स्त्री विषयक दृष्टीकोनAbstract
पारंपरिक समाजव्यवस्थेतील स्त्रियांचा विचार करता असे दिसते की, पुरुषप्रधान संस्कृतीने, स्त्रीचे विविध पातळ्यांवर शोषण केले आहे. परंपरेने तिला ‘अबला’ हे विशेषण लावले आहे. ‘चूल आणि मूल’ इतकेच तिला सीमित ठेवले. तिच्याकडे पाहत असताना न्यूनत्वाच्या दृष्टिकोणातून पाहिले आहे. ‘पुरुषाशिवाय तिला पूर्णत्व येऊच शकत नाही’ हे तिच्या मनावर वारंवार बिंबवण्यात आले. यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीने धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला. त्याचे लेखनही पुरुषांनी त्यांच्या सोयीप्रमाणेच केले. त्यात विविध युक्त्या वापरण्यात आल्या. धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रीचे वर्णन सहनशील, सोशिक, ममतेचा सागर अशारितीने केले गेले. पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडात स्त्री दबतच गेली आणि स्वतःचा आवाज तिचे स्वतंत्र अस्तित्व हरवून बसली. आपण जे त्यागाचे, कष्टाचे जीवन जगत आहोत हेच आपले खरे जीवन आहे. या निर्णयाप्रत तिला आणले गेले. स्त्रीच्या अगतिकतेचे एक अबला म्हणून समाजातील हेच स्थान लक्षात घेऊन १९ व्या शतकात महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री–पुरुष समानतेचा, स्त्री शिक्षणाचा विचार मांडलेला आहे. हा विचार मांडत असतांना त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी १९ व्या शतकात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्रियांच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारात,कार्यात स्त्री स्वातंत्र,स्त्री–पुरुष समानता, स्त्री शिक्षण, स्त्रीविषयक प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.