मराठी साहित्य प्रवाहात जनसाहित्याचे योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/dqw9ej67Abstract
नागपूरच्या प्रा. या. वा. वडस्कर यांनी सामान्य बहुजनवादी' अशी व्यापक भूमिका घेऊन साहित्य निर्मात्यांची संघटना बांधण्याचा व त्याद्वारे शोषित बहुजनांचा आवाज साहित्यप्रांतात बुलंद करण्याचा प्रयत्न केला. या भूमिकेसंबंधी आपली विचारसरणी व मांडणी त्यांनी प्रकट केली ती जळगाव आकाशवाणीवरील त्यांच्या भाषणांनी व पुढे १९८८ मध्ये प्रसिद्ध केली ती 'जनसाहित्याच्या दिशेने' या लेखसंग्रहाच्या माध्यमातून प्रा. या. वा. वडस्करांची भूमिका निखळ माणुसतत्त्वाला मान्यता देणारी नव्हती; तर कष्टकरी, श्रमिक, शोषित वर्गाला समाविष्ट करण्याइतपतच उदार होती. त्यामुळे कधी मार्क्सवादी जनवादी तर कधी बहुजनवादी अशा दोलायमान भूमिकेतून त्यांनी 'जन' साहित्याचा विचार केलेला दिसतो. मात्र या विचाराचा सर्वांगीण विकास करीत पुढचे गौरवास्पद पाऊल उचलले ते डॉ. सुभाष सावरकर यांनी. निखळ माणूस ततत्वाचा शोध घेणारी भूमिका त्यांनी मार्च १९८४ मध्ये मांडली. या व्यापक भूमिकेचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीतून एप्रिल १९८४ मध्ये त्यांनी अक्षरवैदर्भी या मासिकाचा प्रारंभ केला. या मासिकातून त्यांनी जनसाहित्य विषयक लेखन सातत्याने केले; निखळ माणुसकेन्द्री ती भूमिका विकसित केली व १९९३ मध्ये 'जनसाहित्य हा समीक्षा ग्रंथ चळवळीचा लेखाजोखा या रूपात प्रसिद्ध केला.