राजकीय क्षेत्रातील महिलांचे योगदान

Authors

  • डॉ. जयश्री छगनलाल साळुंखे Author

DOI:

https://doi.org/10.7492/cjhe8g08

Keywords:

राष्ट्रपती, अर्थमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राजकीय पक्ष, राजकीय धोरणे, महिलांचे योगदान, चळवळ, मंत्रिमंडळ

Abstract

स्वातंत्र्योत्तर भारतात महिलांनी राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये महिलांनी नेतृत्व केले आणि देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय धोरणांवर प्रभाव टाकला. खाली काही महत्त्वाच्या महिलांचे योगदान दिले आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हरित क्रांती व बँकांचे राष्ट्रीयीकरण यांसारख्या धोरणांत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात निर्णायक नेतृत्व केले. "एमर्जन्सी" लागू करण्यासाठी त्यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सरोजिनी नायडू यांची निवड करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल त्या बनल्या. काँग्रेस पक्षाच्या सर्वात दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचे नाव घेतले जाते. यूपीए सरकार स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. अनेक भारतीय नागरिकांना परदेशात मदत करणारे कार्य त्यांनी केले आहे. मायावती उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत तसेच दलित चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ममता बॅनर्जी देखील पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या आता ही आहेत. ‘तृणमूल काँग्रेस’ पक्षाच्या स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. जयललिता ही तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या. प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या होत्या. नितीशा सिता रमण या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होत्या.

Downloads

Published

2011-2025