भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल
DOI:
https://doi.org/10.7492/p8c0pb44Abstract
आजच्या विज्ञान युगात भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात अत्यंत यशस्वी वाटचाल केलेली आहे.अशी यशस्वी वाटचाल सर्वच क्षेत्रात प्राचीन काळी सुद्धा तिने केलेली होती. परंतु मनुस्मृति या ग्रंथाच्या लिखाणानंतर मात्र स्त्रियांना अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक कुटुंबात व समाजात मिळू लागली. आजपर्यंत सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनी जास्त प्रमाणात केलेली आहे. कुटुंबात सांस्कृतिक मूल्य टिकविण्याची सर्वस्वी जबाबदारी स्त्रियांचीच आहे असा समज मध्ययुगीन काळापासून पुरुषांप्रमाणेच महिलांचाही झालेला आहे.कारण गुलामाला गुलाम म्हणून अनंत काळ अशी वागणूक मिळाल्याने गुलामगिरी करण हेच
आपल्या जीवनाचे अंतिम सत्य आहे असं त्याला वाटू लागलं होतं त्यासाठी प्रत्येक देशात क्रांती पुरुष निर्माण झाले व त्यांनी गुलामगिरीच्या जोखडातून मानवाची सुटका केली. त्याचप्रमाणे स्त्रियांनी फक्त घराच्या चौकटीतच राहावं व चुल आणि मुल सांभाळाव हेच त्यांच कार्यक्षेत्र आहे असा समज वर्षानुवर्षे साहित्यातून सुद्धा स्त्रियांचा करून देण्यात आला होता.अत्यंत दुय्यम व क्षुद्र वागणूक त्यात कमालीचे कर्मकांड व अंधश्रद्धा लिखित स्वरूपात पसरविल्या गेल्यामुळे स्त्रियांची समाजातील स्थिती अत्यंत दयनीय अशी झाली होती.मुलगा असलेल्या श्त्रीयांना विशेष मान होता.
त्यामुळे आज जेव्हा शिक्षणामुळे स्त्रीला तिच्या अधिकाराची व स्वातंत्र्याची जाणीव झाली त्यावेळेस अन्याय सहन करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे हेही तिला समजलं. जी स्त्री सुशिक्षित होईल व आर्थिक स्वायत्तता मिळवेल ती अन्यायाचे जोखड फेकूनच देणार असे पूर्ण सत्य विधान महात्मा फुलेंनी केले होते. त्याचा प्रत्यय आज आपणास समाजात दिसून येतो महिलांचे प्राचीन काळापासून समाज जीवनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. '1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ताराबाई शिंदे कृत स्त्री पुरुष तुलना आणि पंडिता रमाबाई यांच्या श्रीधर्मनीती या पुस्तकातून मांडले गेलेले विचार ही महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या संदर्भात पडलेली महत्त्वाची पावली होती.