अनाथांची आई : सिंधुताई

Authors

  • प्रा. कविता भिकाजी पाटील Author

DOI:

https://doi.org/10.7492/xp8r1q38

Abstract

अनाथ हा शब्द कानावर जरी आला कि सिंधुताई सपकाळ यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. ज्यांनी आपल अख्ख आयुष्य गरजू व अनाथांची काळजी घेण्यातवाहिलं. ज्यांना अख्ख महाराष्ट्र “अनाथांची आई” म्हणून आजही ओळखतो अशा महान माई सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ ला वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे या गावात झाला.

            सिंधुताई सपकाळ यांचा जन्म एका सर्वसामान्य गुरख्यांच्या घरी झाला त्यांचा वडिलांचे अभिमन्यू साठे असे होते. अभिमन्यू साठे हे पेशाने गुराखी असल्याने ते रोज गुर,ढोर चारण्यासाठी नेत असत. ते निरक्षर असूनही त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. आपल्या मुलीने चांगल शिकावं आणि मोठ व्हावं असं त्यांना नेहमी वाटत असे. परंतु सिंधुताई सपकाळ यांचा आईचा त्यांच्या शिक्षणास विरोध होता. त्याचे कारण असे कि, अगोदरच परिस्थिती बेताची तात मुलीचं शिक्षण म्हणजे खर्च वाढणारच म्हणून त्या सिंधू ताईना शाळेत जाऊ देत नसट. परंतु त्यांचे वडील सिंधुताई यांना आपल्या मदतीला म्हणून न्यायचे आणि त्यांना गुपचूप शाळेत पाठवायचे. असं रडत-पडत का होईना त्या इयत्ता चौथी पर्यंत शिकल्या परस्थिती नाजूक असल्याने त्यांना अंगात घालायला बालपणी निटसे कपडे पण नव्हते फाटक्या कपड्यांचे चिंध्यांनी शिवलेले कपडे त्या घालत असत. त्या मुळे सर्व लोक सिंधुताईना “चिंधी” म्हणून चिडवत असत हेच त्याचं टोपण नाव पडल. शिक्षण बंद झाल्यावर घरची सर्व कामे त्या करू लागल्या त्या काळी लहान वयातच मुलींचे लग्न करण्याची रीत होती त्यामुळे सिंधुताई सपकाळ त्यांचा विवाह देखील वयाच्या अगदी ९ व्या वर्षी त्यांच्या पेक्षा २६ वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला.

Downloads

Published

2011-2025