नाशिक जिल्ह्यातील बदलत्या पिकरचनेचा महिलांच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामांचे अध्ययन
DOI:
https://doi.org/10.7492/bw5swr07Keywords:
बदलती पीकरचना, स्त्री-पुरुष प्रमाण, साक्षरता प्रमाण, रोजगार वाढ, उत्पन्न वाढ, भौतिक सुविधा, कुटुंबांचा आर्थिक स्तरAbstract
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात जिल्ह्यातील बदलत्या पिकरचनेचे योगदान असून त्यामुळे जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम झाला, हे जाणण्याच्या हेतूने “नाशिक जिल्ह्यातील बदलत्या पिकरचनेचा महिलांच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामांचे अध्ययन” करण्यात आले. त्यासाठी प्राथमिक व दुय्यम तथ्य संकलन पद्धती वापरली. दुय्यम माहितीच्या आधाराने नाशिक जिल्ह्यातील महिलांची स्थिति तपासण्यात आली. त्यावरून नाशिक जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाण , स्त्रियांची साक्षरता याबाबत सकारात्मक बदल दिसून आला. प्राथमिक तथ्यासाठी यादृच्छिक नमूना निवड पद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यातील 100 महिला शेतकरी निवेदकांकडून माहिती गोळा करून विश्लेषण केले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील पिकरचनेत परिवर्तन झालेले दिसून आले. याशिवाय बदलत्या पिकरचनेमुळे नाशिक जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या रोजगार प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले. याशिवाय पीकरचना बदलल्यामुळे महिलांना उपलब्ध होणाऱ्या भौतिक सुविधामध्ये वाढ झालेली आढळली. अर्थात पिकरचनेत परिवर्तन झाल्याने जिल्ह्यातील महिलांचे राहणीमान सुधारत असल्याचे दिसून आले. एकंदरीत अध्ययनासाठी मानलेली गृहितके सिध्द झालेली आढळतात. संशोधनाच्या शेवटी आवश्यक उपाययोजना देखील सुचविण्यात आलेल्या आहेत.