मराठी लोकनाट्यातील स्त्री कलावंतांची सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थिती व उपाय

Authors

  • प्रा. डॉ. विनोद वासुदेव उपर्वट Author

DOI:

https://doi.org/10.7492/zq3kcw83

Abstract

‘तमाशा’ आणि ‘स्त्री’ या दोन्ही संकल्पना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. तमाशा हा महाराष्ट्राचा पारंपरिक लोकनाट्य प्रकार असून तो मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये गायन, नृत्य आणि अभिनय यांचा सुंदर संगम असतो. परंतु, तमाशाच्या दुनियेत स्त्रीचे स्थान फारसे सोपे आणि सन्माननीय राहिलेले नाही.

            सुरुवातीच्या काळात तमाशामध्ये स्त्रिया नव्हत्या; पुरुषच स्त्री पात्रे साकारत असत. पुढे स्त्रिया तमाशात सहभागी होऊ लागल्या आणि ‘लावणी सम्राज्ञी’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. लावणी हा तमाशाचा मुख्य गाभा असून, त्यात स्त्रियांना प्रमुख स्थान मिळाले. असे असले तरी तमाशातील स्त्रियांना केवळ ‘नर्तिका’ व ‘गायिका’ नव्हे, तर अनेकदा ‘बाई’ या दृष्टीनेच पाहिले गेले. त्यांचे जीवन आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत कठीण राहिले आहे. समाजाने त्यांना नेहमीच एक वेगळे स्थान दिले – कौटुंबिक जीवनापासून वेगळे, प्रतिष्ठेपासून दूर. अनेक तमाशा कलाकारांना ‘बायजाबाई’, ‘गणपतराव’, ‘मास्तर’ अशा पदव्या मिळाल्या, पण तरीही त्यांची सामाजिक पत खालच्या स्तरावर ठेवली गेली.

            तमाशा हा एक लोककला प्रकार असला तरी त्याला पूर्वीच्या काळी त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हते; खरे तर तमाशा हे मराठा भाषेचे वैशिष्ट्ये आहे.तमाशा हे मराठी मनाचे प्रतिबिंब आहे. हा अभिमान असला तरी मराठी माणसाने त्याला अश्लील माननं हेच मनाला पटत नाही. आज समाजात दोन कुटुंबात भांडणे झाली तर भांडणात सुद्धा लोक म्हणतात की, “तुम्ही दोघे भाऊ भांडणे करून दुनियेला तमाशा दाखवू नका” लोकांच्या बोलीभाषेत सुद्धा ‘तमाशा’ म्हणजे वाईट असं बोलल गेल आणि ते नंतर हळूहळू प्रचलित होत गेलं.

Downloads

Published

2011-2025