दलित कवयित्रींचे मराठी साहित्यात योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/atz63492Keywords:
क्रांतीदर्शी, मराठी वाङ्मय, दलित वाङ्मय, साठोत्तरी प्रवाह, आत्मकथन, मानवी मूल्य, तेजस्त्री, हुंकार, आशय व सामाजिकताAbstract
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचाराने दलित साहित्याची मुहूर्तमेढ मराठी वाङ्मयात रोवली गेली. साठोत्तरी प्रवाहात दलित वाङ्मयाला महत्त्वाचे स्थान लाभले ते त्याच्या वेगळेपणामुळे. या साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक, आत्मकथन इ. वाङ्मय प्रकारात दलित शोषितांचे जीवन अधोरेखित झाले आहे. हजारो वर्षांपासून लादलेल्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला गेला. दलित साहित्यातील कविता या प्रकारांतून प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध नकार व विद्रोहाची भाषा व्यक्त केली गेली आहे. अगदी पहिल्या पिढीच्या कवींपासून ते आतापर्यंत ही नकार विद्रोहाची भाषा अलीकडच्या नव्या पिढीतील कविपर्यंत होत आली आहे. दलित साहित्यात विशेषत: दलित कवितेत स्त्रियांनी आपला सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदवला आहे असे दिसून येते.
दलित कविता म्हणजे समाजातील शोषित, पीडित आणि अन्यायग्रस्त वर्गाच्या वेदना, संघर्ष आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे. दलित साहित्याच्या चळवळीच्या माध्यमातून या कवितांनी मराठी साहित्यात नवा आयाम निर्माण केला.