होळकर कुलभूषण - गौतमीबाई होळकर

Authors

  • डॉ. सतिलाल आ. कन्नोर Author

DOI:

https://doi.org/10.7492/bcp40003

Keywords:

खासगी अधिकार, सरंजाम, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, पानिपत

Abstract

भारताच्या मध्ययुगीन कालखंडातील इतिहासात मराठयांचा इतिहास एक महत्त्वाचे पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये राज्याभिषेक करुन लोककल्याणास्तव स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, छत्रपती शांहू यांचे महत्त्वाचे नेतृत्व स्वराज्याच्या उभारणीसाठी लाभले. पुढील काळात स्वराज्य विस्तारासाठी मराठा मंडळानेही मोलाचा हातभार लावला. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट, थोरले बाजीराव पेशवे, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, पेशवे थोरले माधवराव यांच्या काळापासून ते तिसऱ्या पानिपतच्या युध्दापर्यंत मराठा राज्य हे विस्तारातील प्रमुख राज्य होते. १८ व्या शतकामध्ये मराठयांच्या सत्तेचा मोठया प्रमाणात विस्तार झाला. विशेषत: पेशवा थोरले बाजीराव यांच्या काळात मराठा राज्य भारतातील प्रमुख सत्तांपैकी सर्वोच्च स्थानी होते. या राज्य विस्ताराला शिवकाळापासून अनेक सरदार घराण्यांनी मोलाची साथ दिली. तशी परंपराच स्वराज्य रक्षणार्थ व विस्तारासाठी लाभली आहे. या स्वराज्य विस्तारामध्ये 'मल्हारराव होळकर' यांचे नावही प्रामुख्याने दिसते. 'होळकर' घराण्याने मल्हारराव होळकर यांच्या वेळेपासूनच मराठा राज्यविस्तारात मोलाची कामगिरी केली आहे.

            मल्हारराव होळकर यांच्या कर्तृत्वाचा कालखंड इ.स. १७२० ते १७६६ असा प्रदीर्घ आहे. त्यांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या काळापासून ते पेशवे थोरले माधवराव यांच्या काळापर्यंत मराठा राज्याचा काळ पाहिला आहे. इतका मोठा काळ कार्यरत राहणारे अशी प्रतिमा व कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व मराठा राज्यात क्वचितच दिसते. एका सामान्य कुटूंबात जन्म घेवून स्वकर्तृत्वावर स्वत:ची प्रतिमा व कार्य करणारे मल्हारराव होळकर मराठा राज्याचे आधारस्तंभ होते. मल्हारराव होळकर हे इ.स.१७२५ पासून ते इ.स.१७६६ या प्रदिर्घ काळात मराठा राज्यविस्तार व युद्ध- मोहिमांसाठी आपल्या इंदोर या प्रक्षेत्रापासून बाहेर राहत त्यावेळी त्यांच्या संपूर्ण गैरहजेरीच्या काळात सरंजामशाहीचे व खासगीचे संचालन त्यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी केले. काळाच्या प्रवाहात गौतमाबाई यांच्या कार्याची दखल इतिहासाने घेतली नाही त्यांची त्याग आणि संयमीवृतीने मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर ही दोन महान विभूती निर्माण झालेल्या दिसतात. त्यांच्या कार्याचा आढावा पुढीलप्रमाणे-

Downloads

Published

2011-2025