शासकीय योजना आणि महिला सबलीकरण

Authors

  • प्रोफेसर डॉ. आर. के. शिंदे Author

DOI:

https://doi.org/10.7492/ftm5re69

Abstract

वैदिककालीन समाजजीवनाचा अभ्यास करताना या काळातील स्त्री जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक असते. या काळात स्त्री जीवन स्वतंत्र होते. स्त्रियांना अनेक प्रकारचे अधिकार व स्वातंत्र्य होते. अनेक विद्वान व प्रभावशाली स्त्रियांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामधून येतो. एवढेच नाही तर वेद आणि वाङ्मयातील अनेक ऋचांची रचना स्त्रियांनी केली आहे. अपाला, घोषा, विश्ववाटा, सिकता, लोपामुद्रा व निवावसी या स्त्रिया विदूषी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी ऋग्वेदातील काही ऋचांची रचना केलो आहे. लोपामुद्रा ही त्यापैकीच एक विदुषी तपस्विनी स्त्री होती. आपल्या संयम, विद्वत्ता, त्याग व पतिव्रत्यामुळे लोपामुद्राचे नाव प्राचीन इतिहासामध्ये अजरामर झाले. लोपामुद्रा अगस्ती मुनीची पत्नी होती. अगस्ती मुनी व लोपामुद्रा या दोघांनी मिळून ऋग्वेदातील एक सुक्त रचले होते.

            कोणताही समाज किंवा राष्ट्राचा विकास घडवून आणण्यात स्त्री-पुरूषांचा समान वाटा असतो. पुरूष हा घराच्या बाहेरील कार्य करुन विकासाचे कर्तव्य बजावतो तर स्त्रिया घरातील सर्व कामे करुन आपले कर्तव्य पूर्ण करतात. स्त्रिशिवाय पुरूषाचे जीवन अपूर्ण आहे. स्त्री व पुरूष ही जीवारुपी संसाराची दोन चाके आहेत. ही दोन चाके समान चालली तरच जीवन आनंदमय होते. स्त्रीची विविध रुपे आहेत. भगिनी, माता व पती इत्यादींचा सर्व रुपात पतीरुप सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण पतीपद धारण केल्यावरच स्त्री महापदाची अधिकारीणी बनू शकते. वास्तविक पाहता स्त्रीशिवाय पुरूषाची कोणतीही सत्ता राहत नाही, पुरूष एकाकी जीवन जगूच शकत नाही. स्त्री व पुरुष हे नदीच्या दोन किनाऱ्याप्रमाणे आहेत आणि दोहीच्यामध्ये जीवनाची धारा प्रवाहित होत असते. वैदिक साहित्यात स्त्री व पुरूषाला पृथ्वी सर्वश्रेष्ठ लोकांची उपमा दिली आहे. आकाशातून पडलेल्या पावसामुळे पृथ्वीवर वृक्ष व वनस्पतीचा जन्म होते. हीच स्थिती पती-पत्नीची आहे. स्त्री व पुरूष यांच्या मध्यभागी संतती आहे. प्राचीन काळात स्त्रियांची परिस्थिती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी होती. वैदिक काळात स्त्रियांना सन्मान व प्रतिष्टा होती. तिला संपूर्ण स्वातंत्र्य होते. परंतु हीच परिस्थिती नंतरच्या काळात राहिली नाही. प्रारंभीच्या काळात स्त्रियांना सामाजिक, धार्मिक व शिक्षण विषयक अधिकार होते. परंतु कालांतराने त्यांच्या स्थितीत परिवर्तन झाले.

            केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेमुळे महिला सक्षम होत आहेत. शासनाने महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव वाढावा, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक सुधारणा व्हावी यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे महिलांच्या सामाजिक दर्जात सुधारणा झालेली आहे असे समाजात दिसून येते. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या पुढीलप्रमाणे

Downloads

Published

2011-2025