संत सोयराबाई यांचे मध्ययुगीन स्थान व कामगिरी
DOI:
https://doi.org/10.7492/ap1vcv29Abstract
मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाची कवयित्रि म्हणून आपल्याला संत सोयाराबाई यांच्या अभंगांकडे पहावे लागते. बाराव्या शतकातील सोयाराबाईची कविता म्हणजे एका संस्कारक्षम, संवेदनाक्षम, भक्तीप्रवण मनाचे मूक आक्रंदन आहे. इतर संत कवियीत्रीपेक्षा सोयराबाईचे विटाळ विषयक अभंग वेगळे आहेत. सोयराबाईला विठ्ठल कल्पनेतून पहावा लागला होता. आपल्या वेदना दु:ख त्या काळाच्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच मध्ययुगीन काळ आणि परिस्थिती याचा विचार केला असता सोयरबाइची कामगिरी इतर संत कवयित्रीपेक्षा उठून दिसते. माझ्या शोधानिबंधाची मांडणी मी पुढील मुद्यांच्या आधारे करणार आहे.
१. मध्ययुगीन सामाजिक परिस्थिती:
२. सोयराबाई यांचे अभंगातील समाजचित्रण:
३. सोयराबाई यांच्या अभंगातील विद्रोह
४. सोयराबाई यांच्या अभंगातील विटाळविषयक जाणीव