दलित कवयित्रिंची वाटचाल

Authors

  • डॉ. ज्योती शरद इंगळे Author

DOI:

https://doi.org/10.7492/26063197

Abstract

स्वातंत्र्योत्तर काळात भारताने लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली. शिक्षणाचा प्रचार व प्रसार झपाट्याने झाला. शिक्षणाने समाज जागृत झाला. चळवळीच्या माध्यमातून तसेच साहित्यात आपले प्रश्न मांडले.   साहित्यातून मनोरंजन न होता सामाजिक प्रश्न येत गेले. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्यामधून जीवनातील प्रश्न मांडले जाऊ लागले.  भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे. इथे स्त्रियांना दुय्यम समजले जाते. साहित्यातून पुरुषांनी स्त्रीरूपाच्या प्रतिमा निर्माण केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे. 'चूल आणि मूल' तिचे कार्यक्षेत्रात मागे पडले. तिचे पारंपारिक रूपही पालटले. स्त्रियांमध्ये चेतना निर्माण होण्यास  स्त्रीमुक्ती चळवळ  कारणीभूत ठरली.

            दलित साहित्यात कविता या  वाड्मय प्रकारप्रकाराचे विपूल लेखन झालेले दिसून येते. दलित साहित्यात स्त्रीयांनी  कविता  वाड्मय प्रकार विशेष हाताळला आहे. स्त्रीच्या वाट्याला येणारे दुःख हे विदारक स्वरूपाचे असणे स्वाभाविक आहे. स्त्रियांना आपले दुःख, भावनांना वाट मोकळी करून देण्याचे जवळचे माध्यम त्यांना कविता वाटते व कवितेला त्यांनी आपली जीवाभावाची सखी माणून तिच्याजवळ आपले मन मोकळे केले आहे.

            दलित कवितेचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. दलित कवितेतून वेदना, विद्रोह , नकार, दाहक वास्तव अविष्कृत होते. दलित कवितेने नवे अनुभवविश्व, नव्या संकल्पना, नवी क्रांती, नव समाजव्यवस्था या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा कवितेतून होताना दिसते. दलित कवयित्रींनी विपुल कविता लेखन केले आहे. कमी शब्दात भव्य आशय व्यक्त करण्याची ताकद कवितेत असते. दलित  कवयित्रिंच्या वाट्याला आलेले सर्व अनुभव त्या कवितेतून मांडतात. दलित कवयित्रींची कविता ही वास्तवाची जाणीव करून देणारी आहे.

            दलित स्री पददलित आहे. तिच्या वाट्याला दुहेरी शोषण आलं आहे. एक म्हणजे दलित म्हणून तर दुसरे म्हणजे स्त्री म्हणून अशा दुहेरी शोषणाने होरपळलेल्या दलित  स्रीला स्वतः चाआवाज गवसला आणि तिच्या हाती लेखणी आली. आपल्या भावना, विचार, कल्पना, दुःख, हाल, आपेष्टा, शोषण, अत्याचार ती कवितेतून मांडू लागली. दलित स्रीची कविता ही  क्रांतीची भाषा करणारी आहे. वास्तवाचे दर्शन घडवणारी आहे. माणूस म्हणून जगण्याची धडपड ती करू पाहत आहे. अशा जिवंत जीवनानुभवातून दलित कवित्रीची कविता साकार होत जाते. दलित कवयित्रींची परंपरा विशाल होत जाते.

Downloads

Published

2011-2025