भारतीय संविधान निर्मितीत नारीशक्तीचे योगदान

Authors

  • प्रा. डॉ. अनुराधा विजय पोतदार Author

DOI:

https://doi.org/10.7492/wyk49889

Abstract

जगातील जवळजवळ प्रत्येक देशाचे लिखित किंवा अलिखित संविधान आहे. लिखित संविधान म्हणजे ज्यामध्ये सरकार आणि नागरिकांची कर्तव्ये, अधिकार, घटनात्मक व्यवस्थेची रचना आणि संपूर्ण व्यवस्थेचे नियमन करणारे कायदे हे सर्व औपचारिक आणि कायदेशीर पुस्तकात किंवा कागदपत्रांच्या मालिकेत एक पुस्तक म्हणून एकत्र बांधलेले असतात. जिथे लिखित संविधानं नाहीत तिथे मूलभूत तत्त्वे कायदेमंडळाच्या विविध मूलभूत कायद्यांमध्ये, करारांमध्ये आणि न्यायालयाच्या निकालांमध्ये समाविष्ट आहेत. जगातील सर्व्यात लहान लिखित संविधान (3,814 शब्द) हे मोनॅकोच[1] आहे, तर जगातील सर्वात लांब  लिखित संविधान (1,46,385 शब्द) हे भारताच आहे. स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी संविधानसभेला 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस लागले. संविधानसभेच्या एकूण 299 सदस्यांपैकी केवळ 15 महिला होत्या (म्हणजे 95 टक्के पुरुष व 5 टक्के महिला). संविधानसभेतील प्रत्येक सदस्याने खूप परिश्रम घेऊन आपले सर्वोत्तम दिले. भारतीय राज्यघटना आणि संविधानसभेबद्दल आपण पुरुष सदस्यांच्या महत्वाच्या भूमिका, त्यांचे मौलिक विचार, त्यांचे अथकपरिश्रम, त्यांचे विषयाचे ज्ञान व स्पष्टता, त्यांची दूरदृष्टि इत्यादि याबद्दल नेहमीच बोलतो व लिहितो. ते लिहायला हवेच. त्याबद्दल कोणत्याही भारतीयाच्या मनात दुमत नसावे. मात्र, 5 टक्के वेजस्वी नारीशक्तीच्या योगदाना बद्दल क्वाचितच लीहिले जाते, स्मरण केले जाते. या महिलांनी जगातील सर्व्यात मोठ्या संविधानाला अंतिम रूप देण्यासाठी नाविन्यपूर्ण, समतोल, सर्व समावेशक आणि दूरदर्शी असे अनेक पैलू दिले आहेत. हा लेख संविधानसभेतील त्या नारीशक्तीच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकतो.

 

[1] मोनॅको हा पश्चिम युरोपमधील एक लहान देश आहे.

Downloads

Published

2011-2025