कै. कमलाबाई अजमेरा : एक अविस्मरणीय प्रवास

Authors

  • डॉ. दिपक विश्वासराव पाटील Author

DOI:

https://doi.org/10.7492/51xdwq14

Abstract

भारतीय संस्कृतीत महिलांना नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे.

“यत्र नार्यस्तू पूज्यन्ते

रमन्ते तत्र देवता”

            या वचनाने भारताच्या महिलांचा इतिहास पाहता त्यांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अनेक महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे धैर्य, कर्तुत्व आणि निष्ठा यामुळे त्या त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. वेदकाळात महिलांना समाजात मानाचे स्थान होते. त्या शिक्षण, धर्म, प्रशासन, तसेच तत्त्वज्ञानात पुढे होत्या. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या विदुषी स्त्रियांनी वेद आणि उपनिषदांमध्ये आपले योगदान दिले. राजमाता गौतमीबाळा आणि राणी दिद्दा या स्त्रिया उत्तम प्रशासक होत्या. तसेच, प्राचीन काळातील अनेक स्त्रियांना युद्धकलेत पारंगत होण्याची संधी मिळाली होती.

            मध्ययुगात महिलांना अनेक सामाजिक बंधनांना सामोरे जावे लागले, तरीही काही महिलांनी इतिहास घडवला. चित्तोडगडच्या राणी पद्मिनी यांनी आपल्या स्वाभिमानासाठी जोहार केला, ज्यामुळे त्यांचे शौर्य अमर झाले. दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शासक रझिया सुलतान यांनी आपल्या धैर्याने पुरुषप्रधान समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात राणी लक्ष्मीबाई यांनी पराक्रमाने लढा दिला आणि "मी माझी झाशी देणार नाही" हे शब्द अजरामर केले. माळवा राज्याच्या उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरे आणि सार्वजनिक कल्याणकारी प्रकल्प उभारले.

            भारतातील स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या आणि भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. अरुणा आसफ अली १९४२ च्या "भारत छोडो" आंदोलनात त्या अग्रस्थानी होत्या आणि त्यांनी क्रांतिकारी विचारांना चालना दिली. कमला नेहरू आणि कस्तुरबा गांधी या दोघींनी महात्मा गांधींसोबत सत्याग्रह आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. भगतसिंह यांच्या मातोश्री विद्यावती आणि झुंझार नायिका दुर्गाबाई देशमुख यांनी सशस्त्र क्रांतीसाठी योगदान दिले.

            आधुनिक भारतातील महिलांचे यश कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या दोघींनी अंतराळशास्त्रात भारताचे नाव उज्ज्वल केले. किरण बेदीभारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेत मोठे योगदान दिले. इंदिरा गांधी आणि प्रतिभा पाटील इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान तर प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाचे नेतृत्व केले. मिताली राज आणि पी.व्ही. सिंधू क्रीडाक्षेत्रात महिलांनी मोठी झेप घेतली असून, या खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवला.

Downloads

Published

2011-2025