महिला सक्षमीकरणात ग्रंथालयाचे योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/gzqxqa53Abstract
ग्रंथालय हे महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सक्षमीकरणासाठी एक प्रभावी साधन आहे. शिक्षण मानवी जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. महिलांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून केले जाते. महिलांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनात शिक्षण घेत असताना ग्रंथालय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शैक्षणिक व सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयात अमाप स्वरूपात माहितीचे साधने निर्माण करण्यात आलेली आहे त्याचा वापर करून भारतीय महिला आपल्या ज्ञान कक्षा रुंदावू शकतात. ज्याप्रमाणे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जात असतात त्याचप्रमाणे माहितीची गरज वाढत जाते आणि ही गरज पूर्ण करणे हे ग्रंथालयाचे कर्तव्य असते. त्या अनुषंगाने शैक्षणिक व सार्वजनिक ग्रंथालयात विविध प्रकारच्या ग्रंथालयीन सेवा देण्यात येतात. ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तके, ग्रंथ जतन करण्याचे केंद्र नसून अद्यावत माहितीचे ज्ञान स्तोत्र होय. महिलांच्या सक्षमीकरणात ग्रंथालयाचे योगदान अधिक व्यापक आहे. यामध्ये केवळ ज्ञानप्रसाराचा भाग नाही तर सामाजिक, मानसिक आणि भावनिक सक्षमीकरणाची प्रक्रिया देखील सामावलेली आहे.