छत्रपती शिवाजी महाराजांचा जल व पर्यावरण विषयक दृष्टीकोन

Authors

  • प्रा. डॉ. निशांत भिमरावजी शेंडे Author

DOI:

https://doi.org/10.7492/tjnfmk52

Keywords:

जल, पर्यावरण, लोककल्याण

Abstract

छत्रपती शिवाजी महाराज राज्यसंस्थापक होते. त्यांना राज्य वारसा हक्काने मिळालेले नव्हते. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे ते नव्हते. स्वतःच्या कर्तुत्वाने, असामान्य धैर्य, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी दक्खनमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. तत्कालीन परिस्थितीत स्वराज्य स्थापण करणे म्हणजे साधारण बाब नव्हती. परंतु  छत्रपती शिवाजी महाराजानी ही बाब पूर्णत्वास आणली. राज्य स्थापण करणारे शिवाजी महाराज पहिले राजा नव्हते. काही आणखीन होते, परंतु लोंकाच्या मनात शिवाजी महाराजांना जे स्थान मिळाले ते इतरांना मिळू शकले नाही.

            त्यांनी राज्य निर्मितीच्या कार्यात सर्व जाती, धर्माच्या लोंकाचे सहकार्य घेतले. शिवाजी महाराज सर्व धर्मांचा सम्मान करत होते. त्यांच्या धार्मिक धोरणात भेदभावपूर्ण व्यवहाराला कुठलेही स्थान नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भारताच्या सुपीक भूमीमध्ये अनेक हिंदू सम्राट होऊन गेले. पण लोकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्थान निर्माण करता आलं. ते स्थान इतर हिंदू राजांना निर्माण करता आलं नाही. कारण त्यांच्या वर्तनामध्ये, व्यवहारांमध्ये इतर हिंदू राजांपेक्षा वेगळा असा भाव होता. ते लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष असे राजा होते. रयतेची आपल्या मुलाप्रमाणे काळजी करणारे होते. राजा आणि प्रजा यांच्यामध्ये कुठलाही मध्यस्थ नव्हता. त्यामुळे आपल्या रयतेच्या हृदयात ते एक वेगळं स्थान निर्माण करू शकले. भारत भूमीमध्ये अनेक महान सम्राट उदयास आले त्यांनी आपल्या कर्तबगारीने, पराक्रमाने व शौर्याने संपूर्ण भारत भूमीमध्ये आपल्या अफाट अशा साम्राज्याचा विस्तार केला. आपलं वेगळं स्थान भारत या देशात निर्माण केलं.  अशा सम्राटांमध्ये चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, सम्राट अकबर, इत्यादी महान राज्यकर्ते उदयास आले. या महान राज्यकर्त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा मान अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दुर्गाला अनन्यसाधारण महत्व होते. दुर्ग हे स्वराज्याचे आधारस्तंभ होते. दुर्ग म्हणजे किल्ले. प्राचीन काळापासून दुर्गचे संदर्भ प्रकर्षाने दिसून येतात. ऋग्वेदात दुर्गाला पूर हा शब्दप्रयोग केलेला आढळून येतो. तर अमरकोशातही दुर्ग असे म्हटलेले आहे. अग्निपुरणात सहा प्रकार दुर्गाचे प्रकार सांगण्यात आले आहे. त्यामध्ये घनदुर्ग, महिदुर्ग, अब्द्दुर्ग, वृक्षदुर्ग, नृदुर्ग, गिरिदुर्ग इत्यादी.

Downloads

Published

2011-2025