छ. शिवाजी महाराजांची गड किल्ले व शेती सिंचनासाठीची जलव्यवस्थापन निती : ऐतिहासिक विश्लेषण

Authors

  • डॉ. व्ही. जी. सोमकुवर Author

DOI:

https://doi.org/10.7492/4rnne152

Keywords:

गड किल्ले, जलदुर्ग, किल्ल्यावरील जलव्यवस्थापन, शेती, सिंचानासाठीची जलव्यवस्थापन नीती, तलाव, पाटाचे पाणी व्यवस्थापन

Abstract

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज हे महाराष्ट्र व भारतभूमीतील महान राजे व व्यवस्थापक होते. त्यांनी ६ जून १६७४ रोजी स्वतःला राज्याभिषेक करवून घेवून यवनांच्या नाकावर टिच्चून हिंदूंचे स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणी निर्माण केलेले स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अनेक बाबतीत व्यवस्थापन करावे लागले होते. त्यासाठी किल्ले जिंकून घेणे , त्याचे जतन व संवर्धन करणे त्यासाठीचे व्यवस्थापन महत्वाचे होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी किल्य्यांचे महत्व अनन्य साधारण आहे हे महाराजांनी ओळखले होते.  राजसत्तेच्या आणि शत्रूंपासून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ले अति महत्वाचे होते. म्हणूनच शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणी आणि त्याचे व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिले होते. किल्ल्यातील तटबंदीप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे याची त्यांना जाणीव असल्याचे त्यांच्या किल्ल्यावरील भूजल संवर्धन व्यवस्थापन नीती वरून दिसून येते. स्वराज्य हे रयतेसाठी आहे. या रयतेचा प्रमुख उद्योग म्हणजे शेती. शेतीवरच महाराजांच्या राज्याचा महसूल उत्पन्न होत होता. शेती करणारा शेतकरी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहत असे. शेतकऱ्यांना पावसाचे पाणी साठवून संवर्धन करण्यासाठी जलव्यवस्थापन नीतीच्या अंतर्गत विविध उपाययोजना अंमलात आनण्यासाठी मदत केली होती. राजा म्हणून त्यांनी गड किल्ले आणि सिंचन यासाठी केलेल्या भूजल व्यवस्थापन नीतीचा आढावा प्रस्तुत शोधनिबंधातून घेतला आहे.

Downloads

Published

2011-2025