मराठवाडयातील नांदेड जिल्हातंर्गत येणाऱ्या बाभळी बंधारा संदर्भातील पाणी प्रश्नाच्या राजकारणाचा अभ्यास

Authors

  • प्रा. डॉ. माधव शंकर वाघमारे Author

DOI:

https://doi.org/10.7492/c9dmrj59

Abstract

मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.पाणी अस्तित्वात असेल तर हि जीवसृष्टी अस्तित्वात राहू शकते .पाण्याला हिंदी मध्ये “जल है तो कल है” असे म्हटले जाते. पाण्याबद्दल एच. ऑडेन नावाचे विचारवंत म्हणतात हजारो लोक प्रेमाशिवाय जगले पण एकही पाण्याशिवाय नाही. मानवी संस्कृतीच्या विकासात पाण्याची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे जागतिक बँकेचे जलतज्ञ श्री फॅकन मार्क यांच्या मते; कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी पाणी या घटकाला प्राधान्य असते. भारताचे ख्यातनाम जलतज्ञ माधवराव चितळे यांनी “पाण्याला जीवन संबोधले आहे” अन्नाशिवाय मनुष्य काही दिवस जगू शकतो.परंतु पाण्याशिवाय माणसाचे अस्तित्व शून्य आहे. मानवी जीवनात पाण्याला सामाजिक ,राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून महत्त्व आहे. प्रारंभिच्या काळात मनुष्य पिण्यासाठी व स्वत:ची गरज भागविण्यासाठी पाण्याचा वापर करीत असे. पुढे शेतीचा शोध लागल्यानंतर शेतीसाठी पाण्याचा वापर करू लागला. पाण्याचा जस-जसा वापर वाढू लागला तसतसे त्याच्या नियोजनाची गरज भासू लागली. एकीकडे हे नियोजन करताना भौगोलिक सीमेच्या मर्यादेतून देशा-देशात,राज्या-राज्यात व प्रदेशात पाणी वापरावरून, वाटपावरून, कुरघोडी, ताण - तणाव व संघर्ष होऊ लागले. जगामध्ये इ.स.१९१४ ते १९२० या दरम्यान पहिले महायुद्ध झाले. इ.स. १९३९ ते १९४५  काळात दुसरे महायुद्ध झाले तर अनेक विचारवंतानी, शास्त्रज्ञांनी व संशोधकांनी तिसरे महायुद्ध फक्त पाण्यासाठी होईल असे भाकीत केले आहे. ग्रामीण जीवनात शेतकरी उत्पादन प्रक्रिया गतिशील करण्यासाठी पूर्णतः पाण्यावर अवलंबून असतो.आज ग्रामीण भागात शेतकऱ्यासमोर पाण्याचा भयंकर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, मराठवाड्यातील नांदेड जिल्हांतर्गत येणाऱ्या बाभळी बंधा-या संदर्भातील पाण्याचा प्रश्न नेहमी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्यामध्ये चिघळत होता,या बंधाऱ्याच्या पाण्यावरून होणारा संघर्ष हा स्थानिक लोकांपुरता, शेतकऱ्यापुरता मर्यादित न राहता तो विधिमंडळ सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे तो राजकीय केंद्रस्थानी आला.त्यामुळे प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये बाभळी बंधाऱ्याच्या पाणी वाटपासाठी झालेल्या राजकीय संघर्षाचा अभ्यास करण्यात आला आहे.

Downloads

Published

2011-2025