पारंपारिक आदर्श पाणीवाटप फड शेतीपद्धतीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/9ygfjp35Abstract
साक्री तालुक्यातील जगप्रसिद्ध अशी पाणीवाटप करण्याची आदर्श शेतीची फडपद्धत आहे. हि शेतीची फडपद्धत अतिशय वैशिष्ठपूर्ण अशी आहे. खर म्हणजे हा शेती प्रकार गेल्या १०-१५ वर्षापूर्वी साक्री ताल्याक्यातील पांझरा नदी काठावरील प्रत्येक गावात पाहायला मिळत होता. मात्र वर्तमान काळात या शेतिकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचे पाह्यला मिळत आहे. २५ -३० वर्षापुवी या फडपद्धत्तीचे निरीक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावरील जपानचे जलतज्ञ एको जी सिको हे स्वतः १९९५च्या आपल्या टीम सोबत आले होते आणि हि पद्धत पाहून खूपच प्रभावित झाले होते. त्यावेळी त्यांनी साक्री तालुक्यातील मालपुर या गावातील केलेल्या भाषणात हि पद्धत खूपच कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले होते. सरविश्वेश्वरैया हे धुळे येथे असताना ते सुद्धा हि पध्द्त पाहून प्रभावित झाले होते आणि ते मैसूर संस्थांचे दिवान असताना त्यांनी तेथे मोठया प्रमाणात हि नदीवरील पाणीवाटप पद्धत बंधारे बांधून फड पद्धत्ती सारखेच सुरु करण्याचे धोरण होते आणि त्यांनी केले सुद्धा मात्र हि पाणी वाटपाची पद्धत तेथे फारशी यशस्वी झाली नाही. केंद्रीय जल सिंचन आयोगाचे चेअरमन माधवराव चितळे हे सुद्धा हि पद्धत पाह्यला आले होते आणि त्यांनी सुद्धा या पारंपारिक पाणी वाटप प्रकारचे कौतुक केले होते व या पद्धतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दुरदर्शनवर याची फिल्म प्रसारित केली होती. थोडक्यात या पाणी वाटप प्रकारचे कौतुक सर्वत्र होत असताना वर्तमान परिस्थितीत असे चुकीचे काय होत आहे कि संपन्न अशी पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही ऐतिहासिक पद्धत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे या विषयीचे संशोधन करण्याच्या हेतूने संशोधकाने या विषयाची निवड केली आहे.Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles