जलव्यवस्थापनाविषयी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
DOI:
https://doi.org/10.7492/rdxcs819Abstract
निसर्गत: मानवाला नैसर्गिक संसाधनांच्या रूपाने मोफत अशी देणगी मिळाली आहे. भारतात नैसर्गिक संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यात नद्या,पर्वत,डोंगररांगा,खणीजसंपत्ती,वने यांचा समावेश होतो. भारताला निसर्गाने भरभरून दिले आहे. भारताच्या हवामानाचा विचार करता, उन्हाळा,पावसाळा,हिवाळा असे तीन ऋतु साधारपणे दिसून येतात. पावसाळा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात असतो. या चार महिन्यात भारतात सर्वच प्रदेशांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो.
नदी, तलाव, शेततळे, विहीर यांच्या माध्यमातून जे पाणी गोळा होते त्याला भूपृष्टीय जल तर जमिनीच्या भूगर्भात झिरपलेल्या पाण्याला भूगर्भिय जल असे म्हटले जाते. पावसाचे पडणारे पाणी काही नदी,तलाव,शेततळे,विहीर,धरणे,कालवे यांच्यात साठविले जाते. तर बरेचसे पाणी समुद्रात वाहून जाते. भारतात गोड्या पाण्याचे प्रमाण कमी आणि क्षारमय पाण्याचे प्रमाण अधिक आहे.
पाण्याचा वापर पिण्यासाठी, ऊर्जानिर्मितीसाठी, उद्योगासाठी, स्वच्छतेसाठी, वाहतुकीसाठी, शेतीसाठी केला जातो. या सर्वांमध्ये पाण्याचा अधिक वापर शेतीसाठी होत असल्याचे दिसते. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. असे असले तरी मानवी जीवनात उपयूक्त पाणी साठयाचे प्रमाण कमी असून एकूण उपलब्ध पाण्याच्या २.८ टक्के पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात उपयूक्त आहे. ९७.२ टक्के समुद्रिय भागात म्हणजे क्षारमय स्वरूपात आहे.
असे म्हटले जाते की जल है, तो कल है उद्याचा दिवस पाण्यासाठी संघर्ष करणारा असेल. येणाऱ्या प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज निर्माण होत असून पावसाचा पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. “पाणी आडवा, पाणी जिरवा” या युक्तीप्रमाणे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत असतांना पाणी अडवून जमिनीत पाणी जिरवणे आवश्यक आहे. काही विचारवंतांच्या मते येणाऱ्या काळात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन पिण्याच्या पाण्यासाठी युद्ध देखील होऊ शकते. आपल्या भारत देशाला महापुरुषांचा एक मोठा वारसा लाभला आहे. . महात्मा गांधी आणि डॉबाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील जलसिंचनाच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाय सांगितले जे आज देखील दिशादर्शक असे आहे.