‘बारोमास’ कादंबरीतील दुष्काळाचे चित्रण
DOI:
https://doi.org/10.7492/jc5r5r88Abstract
संशोधनाचा हेतू
पाणीटंचाईमुळे तसेच अनियमित पावसामुळे पडणाऱ्या दुष्काळाची जाणीव वरील कादंबरीतून करून देणे.
संशोधन पद्धती
वरील विषयात वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा उपयोग केला आहे.
संशोधनाचे उद्दिष्ट
१) पाणी हा जीवनावश्यक घटक असून पाण्याअभावी शेती आणि मनुष्य जीवन कसे उध्वस्त होते त्याची माहिती कादंबरीतून कथानकाच्या माध्यमातून करून देणे.
२) शेती ही पूर्णत: पावसावर अवलंबून असते परंतु सतत दुष्काळ शेतकऱ्याला कसा कर्जबाजारी करतो हे कादंबरीतून चित्रित करणे.
३) पाण्याअभावी नुसती शेतीच नाही तर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बेकारी त्यातल्या त्यात वाढत जाणारा भ्रष्टाचार याला आळा घालणे किती आवश्यक आहे हे पटवून देणे.
४) ‘बारोमास’ कादंबरी ही नुसती दुष्काळाचेच चित्रण करत नाही तर वर्तमान परिस्थितीत दुष्काळावर कशी मात करता येईल याचा विचार करायला भाग पाडते.
५) वरील कादंबरी ही शेतकऱ्याला ज्या परिस्थितीतून वाटचाल करावी लागते ज्या प्रसंगांना आणि आव्हानांना त्याला सामोरे जावे लागते, ती आव्हाने, ते प्रश्न या कादंबरीतून अधोरेखित करणे.
६) दुष्काळामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विशेषत: विदर्भ - मराठवाड्याकडच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये त्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. उदा. सध्या शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई शासनाकडून मिळत असून अशाच उपाययोजना भविष्यात केल्या जाव्यात जेणेकरून शेतकरी आत्महत्या थांबतील.