वृद्ध महिला - काल आणि आज
DOI:
https://doi.org/10.7492/n9z3sq42Abstract
“वृद्ध महिला-काल आणि आज” हा विषय केवळ काळाच्या परिवर्तनाचा आरसा नाही, तर समाजाच्या बदलत्या प्रवृत्तीचे द्योतक आहे. पूर्वी वृद्ध महिलांना कौटुंबिक केंद्रबिंदू मानले जात असे. त्यांच्या अनुभवाचा सल्ला, संस्काराची शिदोरी आणि घरातील निर्णयांमध्ये त्यांचे महत्व निर्विवाद होते. मात्र आधुनिक काळात सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांनी वृद्ध महिलांची भूमिका आणि स्थानात काहीसा बदल घडवला आहे.
कालच्या काळात त्या घराचा आधारस्तंभ होत्या, तर आज अनेकदा त्या दुर्लक्षित होण्याच्या किंवा एकटेपणाच्या समस्येला सामोऱ्या जात आहेत. हे दृश्य बदलत असताना, त्यांना प्रेम, आदर आणि आपलेपणाची गरज आहे. या बदलाची भावना काव्यातून व्यक्त करणे ही एक सुंदर सुरवात होऊ शकते.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles