गोंदिया जिल्हयातील जलसिंचनाचा विकास
DOI:
https://doi.org/10.7492/5vtrsg45Abstract
कृषी उत्पादण वाढविण्याच्या कोणत्याही संकल्पामध्ये जलसिंचनाला महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजेच कृषी विकासाचा स्तर वाढविण्याच्या दृष्टीने जलसिंचन हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. केवळ निसर्गाच्या लहरीपणावर शेती करणे म्हणजे निवड जुगार होय. म्हणूनच भारतीय शेतीला मान्सूनचा जुगार म्हटल्या जाते. त्यामूळेच भारतीय शेतीचा पाहिजे त्या प्रमाणात आणि समान स्त रावर विकास झालेला नाही. परिणामतः भारतीय शेतकऱ्यांना दारिद्र व बेरोजगारीपासून सुटका मिळत नाही.
‘‘पिकांच्या वाढीसाठी शेतात केलेल्या कृत्रीम जलसंप्रदायास जलसिंचन असे म्हणतात.’’ (लाटनकर ना.सी. - कृषीभूगोल) सिंचन असे साधन आहे की, त्याद्वारे कृत्रीम पाणी पुरवठा करून पिकांच्या सभोवताल पाणी खेळवून धान्य पिकांसाठी पाण्याची उणीव पूर्ण केली जाते. पावसाच्या ऋत्वीक आणि प्रादेशिक वितरणाच्या विषमतेमुळे जलसिंचनाला फार महत्त्व आहे. त्यामूळे गाव, तालुका, जिल्हा, राज्य व पर्यायाने देशाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच कोणत्याही काळात शेतीसाठी जलसिंचन हे अतिशय आवश्यक साधन आहे. कृषीचा विकास होण्यासाठी कृषीपिकांच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. त्यादृष्टिने जलसिंचनाची आवश्यकता असते. विशेषतः कोरड्या व निमकोरड्या हवामानाच्या प्रदेशात विशेष गरज असते. वर्षातील दुबार पिक, तिबार पिकासाठी जलसिंचनाचा सर्वसाधारणपणे उपयोग होतो.