महाराष्ट्रातील मातंग समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी : विश्लेषणात्मक अध्ययन
DOI:
https://doi.org/10.7492/pr2rmq43Abstract
भारतीय समाज हा विविध जाती धर्माने निर्माण झालेला समाज आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे दिसून येते. वैदिक काळापासून ते आजच्या कलयुगात सुद्धा भारतीय समाज व्यवस्था ही क्रमवार वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेवर आधारित आहे. आजच्या घडीला बहुतांशी प्रमाणात वर्णव्यवस्था ही नामशेष झाल्याचे दिसून येते. परंतु जातिव्यवस्था ही दिवसेंदिवस समाज व्यवस्थेला चिकटून राहताना व दृढ होताना दिसून येते. भारतीय समाजात जवळजवळ आठ हजार जाती अस्तित्वात आहेत. परंतु डॉ. श्री. व्य. केतकर यांच्या मते, भारतीय समाज व्यवस्थेत जातीची एकूण संख्या ४००० एवढी आहे. भारतीय समाज व्यवस्थेत जातीच्या निर्मितीच्या संदर्भात सूक्ष्म अभ्यास केला असता असे दिसून येते की, या समाज व्यवस्थेत जातीची निर्मिती केव्हा झाली हे मात्र निश्चित सांगता येत नाही. भारतीय समाज व्यवस्थेत जातीची ही समाज संरचना श्रेष्ठ व कनिष्ठ अशा उतरत्या श्रेणीमध्ये विभाजित झालेली आहे. वरिष्ठ जातींना सवर्ण, मध्यम जातींना मागास तर कनिष्ठ जातींना अस्पृश्य ठरविल्याने प्रत्येक जातीचा दर्जा निश्चित केला गेला आहे. रोटी-बेटी व्यवहारावर व सामाजिक वर्तन या बाबीवर मर्यादा घातल्याने प्रत्येक जात मर्यादित जीवन जगताना दिसून येते.