महाराष्ट्रातील जलव्यस्थापन प्रकल्प उभारणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे योगदान : ऐतिहासिक विश्लेषण

Authors

  • 1. आशिष हिरामण वाघ , 3. डॉ. विनोद गौतम सोमकुवर Author

DOI:

https://doi.org/10.7492/g0gmkf23

Keywords:

यशवंतराव चव्हाण, जलव्यवस्थापन प्रकल्प, धरणे, शेती

Abstract

यशवंतराव चव्हाण हे एक बहुआयामी नेतृत्व होते, ज्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळाली. जलव्यवस्थापन क्षेत्रात त्यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले. त्यांनी सुरू केलेल्या जलविकास प्रकल्पांमुळे जलव्यवस्थापनाच्या धोरणांमध्ये अधिक समर्पण आणि प्रभावीता आली. आजच्या काळात जलसंपत्तीचे योग्य संवर्धन आणि वापर अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी तो सुसंगत आहे. त्यांच्या जलविकासाच्या दृष्टीकोनामुळे आजच्या जलसंकटाशी संबंधित उपाय शोधण्यात मदत होईल. यशवंतराव चव्हाण यांच्या जलविकासातील योगदान, त्यांच्या धोरणांचा प्रभाव, आणि कोयना, उजनी, आणि जायकवाडी यासारख्या प्रमुख जलप्रकल्पांचे शेतकरी, उद्योग आणि राज्याच्या विकासावर काय परिणाम झाले आहेत, याचे विश्लेषण या संशोन पेपरमध्ये करण्यात आले आहे.

Downloads

Published

2011-2025