डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राष्ट्रीय जल व्यवस्थापना मधील भूमिका
DOI:
https://doi.org/10.7492/fm52vx05Keywords:
जल व्यवस्थापन, दामोदर नदी खोरे आणि पूर नियंत्रणAbstract
भारत हा कृषी प्रधान देश असून आजही जवळपास ७०% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीवर आधारित उद्योग-धंदे आहे. कृषी क्षेत्र निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तसेच शेतकरी आत्महत्या, शेती क्षेत्रातील बेकारी, शेतकरी कर्जबाजारीपणा या समस्या कृषी क्षेत्रात आहेत. आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी पाणी आणि वीज या दोन शेती व्यवसायाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आव्हान देशाच्या पुढे आहे. जल व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलसिंचन कार्याचे स्मरण होते. या सर्व महान व्यक्तींनी आपल्या जीवन काळात जल व्यवस्थापनाचे मूल्य ओळखून जल व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले होते. सदर पेपर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दामोदर नदी खोरे, महानदी खोरे, व सोन नदी खोरे यांच्या निर्मितीतील भूमिका व देशाच्या जल व्यवस्थापनामधील भूमिकेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.