डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जलव्यवस्थापन विषयक विचार
DOI:
https://doi.org/10.7492/ca2n9p34Keywords:
जलव्यवस्थापन, आर्थिक विकास, जलनीती व धोरण, शाश्वत विकासAbstract
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजाचे महान विचारवंत, समाजसुधारक आणि संविधान शिल्पकार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास आणि विचार आजही समाजातील अनेक गोष्टींवर प्रभाव टाकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगविख्यात अर्थतज्ञ म्हणून ओळखले जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले उभे आयुष्य दीनदलित, उपेक्षित, वंचित वर्गासाठी,महिलांच्या कल्याणासाठी घालवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रा बरोबरच कायदा, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अशा अनेक क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावली. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र आणि जलधोरणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते.जलव्यवस्थापन, एक अत्यंत महत्त्वाचा घटक, जो समाजाच्या सर्व स्तरांवर परिणाम करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्याय, समानता आणि समावेशी विकासावर ठाम विश्वास होता. जलसंपत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सीमित संसाधन आहे, आणि त्याचे योग्य व्यवस्थापन सामाजिक समतेच्या दृषटिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. जलव्यवस्थापनासंबंधी बाबासाहेबांचे विचार केवळ तांत्रिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही, तर ते समाजाच्या विविध वर्गांसाठी न्याय, समावेश आणि समानता सुनिश्चित करण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते