पांगिरा: पाण्याच्या अपव्ययाने उधळत जाणारी समृद्ध गावाची हळवी यात्रा
DOI:
https://doi.org/10.7492/3xsbet68Abstract
“युवा पिढीला मनोरंजनाच्या माध्यमातून सामान्य नागरिक घडविण्यासाठी चित्रपट मोठी भूमिका बजावतात.”
वॉल्ट डिस्ने, अमेरिकन अभिनेता व चित्रपट निर्माता.
चित्रपट हे मनोरंजनाचे साधन असले तरी त्यातून समाजात लोकप्रबोधन व जनजागृती घडविण्याचे कामही केले जाते. अगदी सुरुवातीपासूनच पाहिले तर चित्रपटाचे विषय पौराणिक कथा, संत साहित्य, ऐतिहासिक घटना, प्रसंग, समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, सामाजिक प्रश्न आणि भान यांना जपणारे होते. अलीकडे तर त्यात मानवी जीवनातील प्रश्न आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर ही प्रकाश टाकला जातोय. भारताची वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येच्या मानाने उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता भविष्यात पाण्यासाठी महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आज अनेक मराठी चित्रपटातून पाणी प्रश्नावर प्रकाश टाकला जात आहे. “तहान” (2008) दिग्दर्शक दासबाबू यांच्या या चित्रपटात घोटभर पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या त्रस्त सामान्य जनतेचे चित्रण करण्यात आलेले आहे. “बारोमास”(2012), “पिपाणी”(2012), “गार्भीचा पाऊस” (2009), “पांगिरा”(2011), आणि नुकताच अलीकडे मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या वर आधारित आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'पाणी' हा चित्रपट असो, यातून थोड्याफार फरकाने का असेना पाणी टंचाईवर भाष्य करण्यात आले आहे. तर कुठे अति पावसाचे परिणाम दाखवण्यात आले आहे.
“गरज बरस प्यासी धरती पर
फिर पानी दे मौला....चिडियोंको दाणे,
बच्चों को गुडदाणी दे मौला पानी दे मौला"
लेखक विश्वास पाटील लिखित कादंबरीवर दिग्दर्शक राजीव पाटील यांनी पांगिरा हा चित्रपट 2011 साली बनवला.
वास्तविकतेचे भान ठेवून जिवंत पात्रांसह ज्वलंत प्रश्नांना समाजापुढे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि चित्रपटातून येणाऱ्या पांगिरा या गावातील पाण्याचा अपव्यय, सततचा उपसा, आणि कमी होत जाणारी भूजल पातळी यामुळे निसर्गाच्या मांडीवर हसत खेळत समृद्ध होणार गाव आणि त्याच गावाचं दुष्काळी गावांच्या यादीत जाणार नाव इथपर्यंतचा प्रवास आपल्यापुढे चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे.